Asia longest wildlife corridor: दिल्ली-देहरादून प्रवास आता सुसाट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते इकॉनॉमिक कॉरिडॉरचे उद्घाटन

या प्रकल्पामुळे दिल्ली-देहरादून हे सहा तासांचे अंतर अवघ्या अडीच तासांवर येणार आहे. वन्यजीवांसाठी तयार केलेल्या भुयारे आणि बोगद्यांमुळे हे प्राणी रस्त्यावर येण्याचे आणि अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.

Asia longest wildlife corridor: दिल्ली-देहरादून प्रवास आता सुसाट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते इकॉनॉमिक कॉरिडॉरचे उद्घाटन

PM Narendra Modi Inaugurates Asia’s Longest Elevated Wildlife Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली-देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले असून, या प्रकल्पामुळे आता दिल्ली ते देहरादून हे सहा तासांचे अंतर अवघ्या अडीच तासांवर येणार आहे. मंगळवारी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी ही मोठी भेट देशवासियांना दिली. दुपारी साडेबाराच्या सुमारास देहरादूनमध्ये झालेल्या सार्वजनिक समारंभात पंतप्रधानांनी या महत्त्वाकांक्षी इकॉनॉमिक कॉरिडॉरचे अधिकृत उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते.

आशियातील सर्वात मोठा एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर

या प्रकल्पाची काही खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आधुनिक इंजिनिअरिंगचा नमुना असलेल्या या प्रकल्पात 12 किलोमीटर लांबीचा आशियातील सर्वात मोठा एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. तसेच यात 340 मीटर लांबीच्या बोगद्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, प्राण्यांना इजा होऊ नये आणि मानव-प्राणी संघर्ष टाळता यावा, या उद्देशाने हा कॉरिडॉर डिझाइन करण्यात आला आहे. या कॉरिडॉरमुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर उत्तराखंडमधील पर्यटनाला आणि व्यापारिक उलाढालीला मोठी गती मिळणार आहे. एकूणच, हा प्रकल्प उत्तर भारताच्या कनेक्टिव्हिटीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो
या दौऱ्याची सुरुवात पंतप्रधानांनी सहारनपूरपासून केली. तिथे त्यांनी दिल्ली-देहरादून एक्सप्रेस-वेवरील वन्यजीव कॉरिडॉरची पाहणी करून नंतर एक भव्य रोड शो केला. या रोड शोमध्ये पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी देहरादूनला पोहोचण्यापूर्वी त्यांनी डाट काली मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे देहरादून शहरात कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. जागोजागी लावलेले मोठे पोस्टर्स आणि समर्थकांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.

हेही वाचा – Bihar Chief Minister : आज बिहारला मिळणार नवीन मुख्यमंत्री, भाजपकडून कोणाची नावं चर्चेत?; जाणून घ्या सविस्तर माहिती

आशिया खंडातील सर्वात मोठ्या वन्यजीव कॉरिडॉरबद्दल थोडक्यात माहिती
गणेशपूर ते अशारोडी या 18 किलोमीटरच्या पट्ट्यात 150 कॅमेरे आणि 29 ध्वनीनोंदक बसवण्यात आले. 40 दिवसांच्या निरीक्षणात सुमारे एक लाखाहून अधिक छायाचित्रे नोंदवण्यात आली. त्यातील 40 हजारातून अधिक छायाचित्रे वन्यजीवांची होती. यात सुवर्ण कोल्हा सर्वाधिक वेळा कॅमेऱ्यात दिसला. तर नीलगाय, सांबर आणि चितळ यांचीही मोठ्या प्रमाणात नोंद झाली. विशेष म्हणजे, या कालावधीत हत्तींच्या 60 सुरक्षित हालचाली भुयारी मार्गातून झाल्याचे आढळले.

– 213 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती मार्गातील सुमारे 12 किलोमीटरचा उन्नत पट्टा वन्यजीवांसाठी तयार करण्यात आला आहे.
– हा भाग राजाजी व्याघ्रप्रकल्प आणि शिवालिक पर्वत रांगेतून जात असल्याने याठिकाणी वन्यप्राण्यांची हालचाल मोठ्या प्रमाणावर आहे.
– सात मीटर उंचीवर उभारलेल्या मार्गाखाली मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वन्यजीवांना अडथळ्याविना मार्ग उपलब्ध झाला आहे.
– काही प्रजातींनी वाहतुकीच्या आवाजाशी जुळवून घेतले आहे. तर, हत्ती आणि चितळ यांसारख्या प्रजाती कमी आवाज असलेल्या भागांचा अधिक वापर करत असल्याचे या अभ्यासात दिसून आले होते. त्यामुळे भविष्यात ध्वनिरोधक भिंती उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
– वन्यप्राण्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी ही रचना करण्यात आली असून, रोडकिल घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भुयारी मार्ग, बोगद्यांचे आकर्षण
– 14 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेत भुयारी मार्ग, बोगदे आणि उंच रस्ते उभारण्यात आले आहे.
– हत्तींसारख्या मोठ्या वन्यप्राण्यांसाठी रुंद भुयारी मार्ग तर लहान प्राण्यांसाठी स्वतंत्र बोगद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
– कमी तीव्रतेचा पिवळा प्रकाश व ध्वनिरोधक भिंती उभारण्यात आल्या आहेत.
– या पट्ट्यात 10.97 किलोमीटर लांबीचा विशेष वन्यजीव भुयारी मार्ग उभारण्यात आला असून, वन्यप्राण्यांच्या मुक्त हालचालीसाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा – Toll Plaza Rules: टोलवर 10 सेकंदांपेक्षा जास्त वाट पाहावी लागतेय? मग टोल देऊ नका, जाणून घ्या काय आहे NHAI नवा नियम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number