Revati Sule Wedding: सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या संगीत सोहळ्यात ‘किंग खान’चा जलवा; ‘या’ गाण्यावर शाहरुखचा जबरदस्त डान्स

या दिमाखदार संगीत सोहळ्यात प्रसिद्ध गायक राहुल वैद्य आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत होते. याच दरम्यान शाहरुख खानने मंचावर हजेरी लावली.

Revati Sule Wedding: सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या संगीत सोहळ्यात ‘किंग खान’चा जलवा; ‘या’ गाण्यावर शाहरुखचा जबरदस्त डान्स

Revati Sule Wedding: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह व्यावसायिक सारंग लखानी यांच्याशी शनिवार, 20 जून 2026 रोजी संपन्न होत आहे. या शाही विवाहसोहळ्याच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या संगीत सोहळ्यातील एक अप्रतिम व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान स्टेजवर थिरकताना दिसत असून, त्याने आपल्या खास शैलीत संपूर्ण कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे.

राहुल वैद्यच्या मंचावर ‘किंग खान’ची एन्ट्री
या दिमाखदार संगीत सोहळ्यात प्रसिद्ध गायक राहुल वैद्य आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत होते. याच दरम्यान शाहरुख खानने मंचावर हजेरी लावली आणि ‘कुछ कुछ होता है’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील ‘कोई मिल गया’ या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स केला. राहुल वैद्यने हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना राहुलने लिहिले, “काल रात्री किंग खानने आमच्या मंचाची शोभा वाढवली! रेवती आणि सारंग यांच्यासाठी ही रात्र खरोखरच अविस्मरणीय ठरली.”

खऱ्या आयुष्यातही जिंकली मने; राहुल वैद्यला मारली मिठी
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खान केवळ डान्स करतानाच नाही, तर वधू-वरांवर प्रेमाचा वर्षाव करतानाही दिसत आहे. मोठ्या पडद्याप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही लोकांची मने कशी जिंकायची, हे शाहरुखला अचूक ठाऊक आहे, याची प्रचिती या व्हिडिओतून येते. डान्स दरम्यान शाहरुख खानने गायक राहुल वैद्यला प्रेमाने मिठी मारली आणि त्याच्या गाण्याच्या तालावर काही नृत्याविष्कारही सादर केले, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.

हेही वाचा – Eetha Movie: प्रसूतीकळा तरी पाय थांबले नाहीत! ‘ईठा’ चित्रपटाचा काळीज पिळवटून टाकणारा टीझर सोशल मीडियावर व्हायरल; श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं होतयं कौतुक

कोण आहेत रेवती सुळे?
रेवती सुळे या ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांच्या नात आणि खासदार सुप्रिया सुळे व व्यावसायिक सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत. महाराष्ट्रातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या राजकीय घराण्याशी संबंधित असूनही, रेवती यांनी स्वतःला सक्रिय राजकारणापासून आणि सार्वजनिक प्रकाशझोतापासून नेहमीच दूर ठेवले आहे.

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता
दरम्यान, बॉलिवूडच्या या ‘बादशहा’च्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान सध्या सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘किंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, सुहाना खान आणि अनिल कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून 24 डिसेंबर 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number