Ketu Nakshatra Gochar 2026: पुन्हा शून्यातून सुरुवात.. की नशीब पालटणार? 29 मे पासून केतुचा नक्षत्र बदल, तुमच्या राशीला काय-काय देणार

केतुच्या प्रभावामुळे मानवी जीवनात अनेकदा अकस्मात धनलाभ किंवा मान-सन्मान मिळतो, तर काही वेळा यामुळे मोठे मानसिक दडपण आणि अडचणीही निर्माण होतात.

Ketu Nakshatra Gochar 2026: पुन्हा शून्यातून सुरुवात.. की नशीब पालटणार? 29 मे पासून केतुचा नक्षत्र बदल, तुमच्या राशीला काय-काय देणार

Ketu Nakshatra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रामध्ये केतु हा एक अत्यंत रहस्यमयी आणि अचानक अनपेक्षित बदल घडवून आणणारा छाया ग्रह मानला जातो. केतुच्या प्रभावामुळे मानवी जीवनात अनेकदा अकस्मात धनलाभ किंवा मान-सन्मान मिळतो, तर काही वेळा यामुळे मोठे मानसिक दडपण आणि अडचणीही निर्माण होतात. याच केतुचे एक महत्त्वाचे नक्षत्र परिवर्तन येत्या काळात होणार आहे. येत्या 29 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजून 16 मिनिटांनी केतु मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. हे नक्षत्र गोचर 30 जून 2026 पर्यंत प्रभाव गाजवणार असून, याचा सर्व 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही प्रकारचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

केतुच्या या नक्षत्र बदलामुळे काही ठराविक राशींच्या जातकांना नशिबाची भक्कम साथ मिळणार असून त्यांचे रखडलेले आर्थिक प्रश्न सुटू शकतात. या भाग्यवान राशी खालीलप्रमाणे आहेत.

– सिंह रास: केतुच्या या गोचरचा सर्वात मोठा आणि शुभ प्रभाव सिंह राशीवर दिसेल. या काळात तुमचा भाग्योदय होण्याची दाट शक्यता असून, नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. मित्रांसोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्ही एखाद्या मनसोक्त प्रवासाला जाऊ शकता.

– मिथुन रास: तुमच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल. जुन्या आजारांमधून सुटका होऊन आरोग्य सुधारेल आणि आर्थिक आघाडीवर अचानक मोठा धनलाभ होण्याचे योग बनत आहेत.

– धनु रास: विशेषतः नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ यशाचा मार्ग मोकळा करेल. व्यावसायिक कामासाठी केलेले प्रवास फायदेशीर ठरतील आणि कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवण्याची संधी मिळेल.

– तूळ रास: नवीन व्यावसायिक योजना आखल्यास त्यातून उत्तम नफा मिळेल. तुम्हाला या काळात जुन्या गुंतवणुकीतून किंवा वडिलोपार्जित संपत्तीमधून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

– वृश्चिक रास: परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना नोकरीच्या नवीन आणि चांगल्या संधी चालून येतील. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल.

– मीन रास: स्पर्धा परीक्षा किंवा इतर क्षेत्रातील स्पर्धेत तुम्हाला विरोधकांवर मात करून पुढे जाण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील, मात्र मोठा आर्थिक निर्णय घेताना सावध राहावे.

हेही वाचा – Adhik Maas Ekadashi 2026 : 3 वर्षांतून येणाऱ्या 'अधिक मासातील' दोन एकादशींमुळे मिळते महापुण्य; जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि उपवास सोडण्याची वेळ

काही राशींसाठी केतुचे हे मघा नक्षत्रातील भ्रमण मानसिक तणाव, आरोग्याच्या तक्रारी आणि आर्थिक संकटांचे संकेत देत आहे. या राशींनी प्रत्येक पाऊल जपून टाकणे गरजेचे आहे.

– मेष रास: तुमच्या व्यावसायिक क्षेत्रावर आणि व्यापारावर याचा थेट परिणाम होऊ शकतो. विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतील आणि नोकरीत अचानक नवीन जबाबदाऱ्या वाढतील. खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने बजेट सांभाळावे लागेल. 

– कर्क रास: कौटुंबिक वाद टाळण्यासाठी तुम्हाला संयम आणि गांभीर्य ठेवावे लागेल. मानसिक ताणामुळे झोप न येणे किंवा इतर आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.

– वृषभ रास: या काळात तुमच्या मनात सातत्याने अस्वस्थता आणि संभ्रमाची स्थिती राहील. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे आर्थिक किंवा वैयक्तिक बाबतीत महागात पडू शकते. तथापि, विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

– मकर रास: तुमच्यासाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असला तरी विद्यार्थ्या स्पर्धा परीक्षेत चांगले यश आणि पदोन्नतीचे (Promotion) योग आहेत, ज्यामुळे पगारवाढही होऊ शकते.

– कन्या रास: अचानक उद्भवणाऱ्या अनपेक्षित खर्चामुळे पैशांचे नुकसान होण्याची भीती आहे. असे असले तरी व्यावसायिक विस्ताराच्या योजना यशस्वी होतील आणि आयुष्यात एखाद्या नव्या व्यक्तीचे आगमन होऊ शकते.

– कुंभ रास: कोर्ट-कचेरी किंवा कोणत्याही कायदेशीर प्रकरणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कार्यक्षेत्रात तुमची पत मजबूत होईल आणि जुन्या शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

नक्षत्राच्या प्रभावाचा एकूण गोषवारा
ज्योतिषीय गणनेनुसार केतुचे हे मघा नक्षत्रातील मार्गक्रमण केवळ 1 महिन्यासाठी म्हणजेच 30 जूनपर्यंत चालणार आहे. हा काळ संक्षिप्त असला तरी सर्व राशींच्या निर्णयक्षमतेवर आणि मानसिक स्थितीवर याचा मोठा प्रभाव पडणार आहे. ज्या राशींना या काळात आर्थिक किंवा मानसिक अडचणी जाणवतील, त्यांनी संयम राखणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष न करणे हाच या नकारात्मक प्रभावापासून वाचण्याचा उत्तम मार्ग ठरेल.

हेही वाचा – Budh Uday : बुध ग्रहाचा उदय 'या' 5 राशींचे नशीब पालटवणार; नोकरी-व्यवसायात मिळेल अफाट यश! रखडलेली कामेही मार्गी लागतील 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number