Kedarnath Dham : 181 दिवसानंतर उघडले केदारनाथ धामचे कपाट, ‘हर हर महादेव’चा जयघोष आसमंतात घुमला; भाविकांकरता नोंदणी प्रक्रिया सुरू

केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांसाठी केवळ नावनोंदणी करणे पुरेसे नसून, त्याशिवाय प्रवासाची परवानगी मिळणार नाही. प्रत्येक यात्रेकरूला आणि वाहनाला अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

Kedarnath Dham : 181 दिवसानंतर उघडले केदारनाथ धामचे कपाट, ‘हर हर महादेव’चा जयघोष आसमंतात घुमला; भाविकांकरता नोंदणी प्रक्रिया सुरू

Kedarnath Dham Kapat Open on 22 April 2026 :  आज 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:00 वाजता वृषभ लग्नस्थानी असलेल्या मुहूर्तावर श्री केदारनाथ धामचे कपाट भाविकांसाठी पूर्ण विधीवत उघडण्यात आले. तब्बल 6 महिने बंद राहिल्यानंतर आता भाविकांना बाबा केदार यांचे दर्शन घेता येणार आहे. या विशेष प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी परंपरेनुसार पत्नीसह मंदिरात दर्शन घेतले. दिल्ली आणि पश्चिम बंगालमधून मागवलेल्या 51 क्विंटल फुलांनी मंदिर परिसर अतिशय भव्य रीतीने सजवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून चारधाम यात्रेच्या शुभेच्छा दिल्या असून बाबांची कृपा सर्वांवर राहू दे, अशी प्रार्थना केली आहे. याआधीच अक्षय्य तृतीयेला (19 एप्रिल) गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे उघडण्यात आले होते. तर, उद्या 23 एप्रिलला बद्रीनाथ धामाचे दरवाजे उघडणार आहेत.

blockquote class=”twitter-tweet”>

देवभूमि उत्तराखंड की पवित्र धरती पर आज श्री केदारनाथ धाम के कपाट पूरे विधि-विधान के साथ हम सभी श्रद्धालुओं के लिए खोल दिए गए हैं।

केदारनाथ धाम और चारधाम की यह यात्रा हमारी आस्था, एकता और समृद्ध परंपराओं का दिव्य उत्सव है। इन यात्राओं से हमें भारत की सनातन संस्कृति के दर्शन भी… pic.twitter.com/BYQItBsZi4

— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2026

यात्रेसाठी ‘रजिस्ट्रेशन’ अनिवार्य
केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांसाठी केवळ नावनोंदणी करणे पुरेसे नसून, त्याशिवाय प्रवासाची परवानगी मिळणार नाही. प्रत्येक यात्रेकरूला आणि वाहनाला अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीनंतरच भाविकांना स्लॉट टोकन दिले जाईल, जे प्रवासात ठिकठिकाणी तपासले जाईल. नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालील मार्ग वापरू शकता:
वेबसाइट: registrationandtouristcare.uk.gov.in वर जाऊन माहिती भरा.
मोबाईल ॲप: ‘Tourist Care Uttarakhand’ ॲप डाऊनलोड करा.
व्हॉट्सॲप: +91 8394833833 या क्रमांकावर ‘Yatra’ लिहून पाठवा.

मंदिर परिसरात मोबाईल आणि कॅमेरावर बंदी
यंदा प्रशासनाने नियमावलीत मोठे बदल केले आहेत. केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगोत्री मंदिर परिसरात मोबाईल फोन आणि कॅमेरा वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे किंवा रील तयार करणे आता गुन्हा मानला जाईल आणि अशा व्यक्तींवर दंडनीय कारवाई केली जाईल. भक्तांसाठी आपले फोन जमा करण्यासाठी क्लोक रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शांतता आणि धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack : ‘दहशतवाद्यांचे कट कधीही यशस्वी होणार नाहीत’; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास पोस्ट

गैर-हिंदू भाविकांसाठी ‘विशेष अटी’
यंदा प्रथमच तीन मुख्य धामांमध्ये (बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्री) गैर-हिंदू भाविकांच्या प्रवेशाबाबत काही कठोर अटी लागू करण्यात आल्या आहेत. गंगोत्री मंदिर समितीने प्रवेशासाठी ‘पंचगव्य’ (गायीचे मूत्र, शेण, दूध, दही आणि तुपाचे मिश्रण) प्राशन करणे अनिवार्य केले आहे. तसेच, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने स्पष्ट केले आहे की, गैर-हिंदू भाविकांना प्रवेश हवा असल्यास त्यांना सनातन धर्मावर विश्वास असल्याचे शपथपत्र (Affidavit) जमा करावे लागेल. या नियमांचे पालन करणे सर्व पर्यटकांसाठी आवश्यक आहे.

आरोग्य तपासणी आणि इतर महत्त्वाचे
केदारनाथची वाट खडतर असल्याने 55 वर्षांवरील भाविकांसाठी मेडिकल चेकअप अनिवार्य करण्यात आले आहे. अस्थमा किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी आतापर्यंत सुमारे 19 लाख भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे, तर गेल्या वर्षी हा आकडा 51 लाखांच्या वर होता.

हेही वाचा – Pahalgam Attack : ‘ज्या दिवशी देश दहशतवादमुक्त होईल, तोच आमचा खरा न्याय’; पुण्याच्या जगदाळे कुटुंबाने व्यक्त केला खंबीर निर्धार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number