Kashmir Tourist Places Reopen: उपराज्यपालांचा मोठा निर्णय! जम्मू-काश्मीरमधील ‘ही’ 7 पर्यटन स्थळे पुन्हा सुरू होणार

राज्य प्रशासनाच्या या निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यवसायिकांनी स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा कारणास्तव ही ठिकाणे बंद करण्यात आली होती.

Kashmir Tourist Places Reopen: उपराज्यपालांचा मोठा निर्णय! जम्मू-काश्मीरमधील ‘ही’ 7 पर्यटन स्थळे पुन्हा सुरू होणार

Kashmir Tourist Places Reopen: जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्मीर खोऱ्यातील सात बंद पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अरु व्हॅली, राफ्टिंग पॉईंट यान्नर, अक्कड पार्क, पादशाही पार्क आणि कमान पोस्ट यांचा समावेश आहे. तसेच जम्मू विभागातील दागन टॉप, कठुआमधील धग्गर, सलालमधील शिव गुहा आणि रियासीतील पर्यटन स्थळे 29 सप्टेंबरपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.

राज्य प्रशासनाच्या या निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यवसायिकांनी स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा कारणास्तव ही ठिकाणे बंद करण्यात आली होती. या निर्णयाच्या आदल्या दिवशी श्रीनगर राजभवनात युनिफाइड मुख्यालयाची (UHQ) महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. यात लष्कराचे उत्तरी कमांडर, पोलिस महासंचालक, मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत संपूर्ण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर ही स्थळे पुन्हा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा – Phuket-Mumbai Flight : फुकेत–मुंबई विमान प्रवासात प्रवाशाने शौचालयात पेटवली सिगारेट; विमानतळावर अटक

एलजी मनोज सिन्हा यांनी एक्सवर माहिती देताना सांगितलं की, 'सखोल सुरक्षा आढावा आणि चर्चेनंतर मी काश्मीर व जम्मू विभागातील पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. खबरदारी म्हणून ही स्थळे तात्पुरती बंद करण्यात आली होती.' जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिन्हा यांनी देशभरातील नागरिकांना जम्मू-काश्मीरला भेट देण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटलं की, 'भारताचा मुकुट रत्न असलेले जम्मू-काश्मीर हे चित्तथरारक दृश्ये, सांस्कृतिक वारसा आणि आदरातिथ्य यासाठी वर्षभर पर्यटकांना आकर्षित करत राहील.'

हेही वाचा – PM Modi Launches 4G Network : पंतप्रधान मोदींकडून BSNL चं स्वदेशी 4G नेटवर्क लोकार्पण; देशभरात 98 हजार टॉवर्स सुरू

दरम्यान, उधमपूरजवळील सेवज धार भागात झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. सुरक्षा दल आणि JKP-SOG च्या संयुक्त पथकांनी या मोहिमेत सहभाग घेतला असून शोधमोहीम सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number