Kamala Harris: ‘ही कृती बेकायदेशीर आणि वेडेपणाची’; कमला हॅरिस यांचे ट्रम्पवर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे गंभीर आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पावलामुळे अमेरिका अधिक सुरक्षित किंवा सामर्थ्यवान झालेली नाही, अशा शब्दांत कमला हॅरिस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Kamala Harris: ‘ही कृती बेकायदेशीर आणि वेडेपणाची’; कमला हॅरिस यांचे ट्रम्पवर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे गंभीर आरोप

Kamala Harris on Donald Trump : अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उगी आहे. या कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना अमेरिकेने ताब्यात घेतले असून, या लष्करी मोहिमेत किमान 40 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अमेरिकेतूनच उमटत असून माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे.

‘मादुरो क्रूर असले तरी ही कृती बेकायदेशीर आणि वेडेपणाची’; कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पावलामुळे अमेरिका अधिक सुरक्षित किंवा सामर्थ्यवान झालेली नाही, अशा शब्दांत कमला हॅरिस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर पोस्ट शेअर करताना त्यांनी म्हटले की, “मादुरो हे नक्कीच एक क्रूर हुकूमशहा आहेत, पण म्हणून अमेरिकेने केलेली ही लष्करी कारवाई बेकायदेशीर आणि वेडेपणाची ठरते, हे नाकारता येणार नाही.” तेल आणि सत्ता परिवर्तनासाठी खेळल्या जाणाऱ्या युद्धांचा शेवट नेहमीच अराजकतेत होतो आणि त्याची मोठी किंमत शेवटी अमेरिकेतील सामान्य कुटुंबांना मोजावी लागते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Donald Trump : रशियाच्या तेलावरून डोनाल्ड ट्रम्पचा भारताला इशारा; म्हणाले, ‘…तर अमेरिका आयात शुल्क वाढवू शकते’

लोकशाही नव्हे, तर ‘तेला’साठी पुकारलेले युद्ध?
हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, व्हेनेझुएलातील हा हस्तक्षेप अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी किंवा लोकशाही वाचवण्यासाठी नसून तिथल्या अफाट तेल साठ्यावर ताबा मिळवण्यासाठी आहे. “ट्रम्प यांना जगातील सर्वात शक्तिशाली नेता बनायचे आहे आणि त्यासाठी ते अमेरिकन सैनिकांचा जीव धोक्यात घालत आहेत,” असे हॅरिस म्हणाल्या. जर ट्रम्प यांना खरोखरच ड्रग्जची चिंता असती, तर त्यांनी मादुरोच्या सहकाऱ्यांशी संधान साधले नसते किंवा तिथल्या विरोधी पक्षाला डावलले नसते, असा दावाही त्यांनी केला आहे. कोणत्याही ठोस योजनेशिवाय अब्जावधी डॉलर्स खर्च करून संपूर्ण भूभाग अस्थिर केल्याबद्दल कमला हॅरिस यांनी नाराजी व्यक्त केली.

व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी आणि वाढता तणाव
इतका मोठा विरोध होऊनही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी आता व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारची धुरा सांभाळणाऱ्या डेल्सी रॉड्रिग्ज यांना थेट इशारा दिला आहे. अमेरिकेने मांडलेल्या अटी आणि मागण्यांची पूर्तता न झाल्यास व्हेनेझुएलाला पुन्हा एकदा लष्करी हल्ल्याचा सामना करावा लागेल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या धमकीमुळे व्हेनेझुएलातील सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भू-राजकीय तणाव कमालीचा वाढला आहे.

हेही वाचा – Elon Musk : ‘युजर दोषी आहे, Grok नाही’; भारत सरकारच्या नोटीसनंतर एलॉन मस्कने अश्लील AI कंटेट प्रकरणी हात झटकले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number