Strange Theft : चोराने 17 लाखांचे 60 हिरे आणि 15 नीलम जडवलेले अंडे गिळल्याचा आरोप; कुठे घडला हा चोरीचा अनोखा प्रकार

एका आगळ्यावेगळ्या चोरीच्या घटनेमुळे जगभरात मोठी चर्चा रंगली आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर रत्नजडित दागिना गिळल्याचा आरोप आहे. या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पण..

Strange Theft : चोराने 17 लाखांचे 60 हिरे आणि 15 नीलम जडवलेले अंडे गिळल्याचा आरोप; कुठे घडला हा चोरीचा अनोखा प्रकार

Strange Theft in New Zealand: न्यूझीलंडमध्ये एका आगळ्यावेगळ्या चोरीच्या घटनेमुळे मोठी चर्चा रंगली आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर रत्नजडित (Jewel-studded) फॅबर्जी अंडे (Fabergé Egg) गिळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याने तब्बल 17 लाख रुपयांचे अंडे गिळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मध्य ऑकलंडमधील (Auckland) पॅट्रीज ज्वेलर्समध्ये शुक्रवारी (28 नोव्हेंबर) दुपारी पोलिसांना (Police) बोलावण्यात आले आणि काही मिनिटांतच 32 वर्षांच्या एका व्यक्तीला अटक (Arrest) करण्यात आली.

गिळलेले अंडे अद्याप बेपत्ता
पोलिसांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या संशयित आरोपीने गिळलेले फॅबर्जी अंडे अद्यापही सापडलेले नाही. या अंड्यांची किंमत 33,585 न्यूझीलंड डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 17,39,400.73 रुपये इतकी आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ऑक्टोपसी अंड्याचे वैशिष्ट्य
पार्ट्रिज ज्वेलर्सच्या वेबसाईटनुसार, चोरी झालेल्या या फॅबर्जी अंड्यावर 60 पांढरे हिरे (White Diamonds) आणि 15 नीलम (Sapphires) जडलेले होते. विशेष म्हणजे, हे अंडे उघडल्यानंतर आतमध्ये 18 कॅरेट सोन्याचा एक छोटा ऑक्टोपस दिसतो. याच कारणामुळे या अंड्याला 'ऑक्टोपसी' अंडे (Octopussy Egg) असे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा – Viral Video : नजर जाईल तिथे चमकणाऱ्या सौर पॅनेलच्या पर्वतरांगा! चीनमधील हा'' ड्रोन व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

जेम्स बाँड चित्रपटावरून नाव
या अंड्याचे नाव हॉलीवूडचा (Hollywood) जगप्रसिद्ध जेम्स बाँड (James Bond) चित्रपट मालिकेवरून ठेवण्यात आले आहे. 1983 मध्ये आलेल्या 'ऑक्टोपसी' (Octopussy) नावाच्या चित्रपटाची कथा याच फॅबर्जी अंड्याच्या चोरीवर केंद्रित होती. फॅबर्जी हा दोन शतकांपूर्वी रशियामध्ये (Russia) स्थायिक झालेला एक जगप्रसिद्ध ज्वेलर (Jeweler) आहे, जो रत्ने आणि मौल्यवान धातूंनी बनवलेल्या त्याच्या अंड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

इतर चोरीचे आरोप
फॅबर्जी अंड्याच्या चोरीच्या संशयिताला 8 डिसेंबरला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, याच व्यक्तीवर 12 नोव्हेंबरला त्याच ज्वेलरी दुकानातून कथितरीत्या आयपॅड चोरल्याचाही आरोप आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी एका ठिकाणावरून 100 न्यूझीलंड डॉलर्स किंमतीचे कॅट लिटर (Cat Litter) आणि पाळीव प्राण्यांवरील पिसू (Fleas) हटवण्यासाठीची कीटकनाशके पळवल्याचा आरोपही या संशयितावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा – Android Phone Ban: 'या' देशाच्या सैन्यात Android Phone वर पूर्ण बंदी! सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आता फक्त iPhone अनिवार्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number