Jay Bhanushali-Mahhi Vij Divorce: 14 वर्षांचा संसार मोडला! जय भानुशाली आणि माही विज यांच्या नात्याला पूर्णविराम

सुरुवातीला या जोडीने परदेशात जाऊन ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला आणि त्यानंतर 2011 मध्ये अधिकृतपणे लग्नगाठ बांधली. मात्र, लग्न झाल्याचे लपवून ठेवले.

Jay Bhanushali-Mahhi Vij Divorce: 14 वर्षांचा संसार मोडला! जय भानुशाली आणि माही विज यांच्या नात्याला पूर्णविराम

Jay Bhanushali-Mahhi Vij Divorce : टीव्ही क्षेत्रातील चाहत्यांसाठी 2026 सालाची सुरुवातच एका मोठ्या धक्क्याने झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू होत्या, त्या आता खऱ्या ठरल्या आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि आदर्श मानले जाणारे जोडपे, जय भानुशाली आणि माही विज यांनी अधिकृतपणे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 14 वर्षांचा हा प्रवास थांबवून त्यांनी आता आपल्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले असून सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे.

सुरुवातीला या जोडीने परदेशात जाऊन ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला आणि त्यानंतर 2011 मध्ये अधिकृतपणे लग्नगाठ बांधली. मात्र, करिअरमध्ये अडथळे येतील या भीतीने त्यांनी आपले लग्न अनेक महिने जगापासून लपवून ठेवले होते. एका पार्टीत जेव्हा माही गळ्यात मंगळसूत्र घालून पोहोचली, तेव्हाच त्यांच्या लग्नाचे गुपित सर्वांसमोर उघड झाले होते. जयच्या प्रतिमेमुळे हे लग्न फार काळ टिकणार नाही, असे सुरुवातीला अनेकांना वाटायचे, पण जयने मात्र माहीमुळे त्याचे पूर्ण आयुष्य बदलल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले होते.

भावूक पोस्ट आणि मुलांचे भविष्य
इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या जोडीने ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. एका भावूक पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, "आमच्या 14 वर्षांच्या प्रवासात आम्ही अनेक चढ-उतार पाहिले, पण आता आम्ही परस्पर संमतीने वेगळे होत आहोत." हा कठीण निर्णय केवळ त्यांच्या वैयक्तिक भविष्यासाठीच नव्हे, तर मुलांच्या हितासाठी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, जरी त्यांचा संसार मोडला असला, तरी मुलांच्या संगोपनासाठी ते 'को-पेरेंटिंग' करणार असून नेहमी एकमेकांचे चांगले मित्र म्हणून सोबत राहतील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा – Jay Dudhane: काही दिवसांपूर्वीच लग्न; फसवणुकीचा गंभीर आरोप, जय दुधाणेला मुंबई विमानतळावरून अटक; नेमकं प्रकरण काय?

फिल्मी लव्हस्टोरी आणि लग्नाचे गुपित
जय आणि माहीची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी रंजक होती. एका मित्राच्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली होती, मात्र त्यावेळी त्यांच्यात फारसे बोलणे झाले नाही. बरोबर 1 वर्षानंतर एका क्लबमध्ये पुन्हा गाठ पडल्यावर त्यांच्यात प्रेमाचे नाते फुलले. जयने एका जुन्या मुलाखतीत कबूल केले होते की, माही हीच त्याची पहिली आणि शेवटची प्रेयसी होती. जयने 31 डिसेंबर 2009 रोजी माहीला लग्नासाठी विचारले होते, त्यानंतर त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला.

जीवनाच्या वाटेवर स्वतंत्र
ज्या नात्याला एकेकाळी टीव्ही विश्वातील 'आदर्श' म्हटले जायचे, ते आज संपुष्टात आल्याने चाहते सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करत आहेत. मुलांशी असलेली त्यांची प्रचंड ओढ पाहता, या कठीण काळातही मुलांवर कोणताही मानसिक परिणाम होऊ नये, ही या दोन्ही कलाकारांची प्राथमिकता आहे. एकेकाळी लोक जयला 'कॅसानोवा' म्हणायचे, पण माहीच्या साथीने त्याने त्या सर्व चर्चा फोल ठरवल्या होत्या. आज मात्र याच प्रवासाचा अंत झाला असून, दोन्ही कलाकार आता त्यांच्या जीवनाच्या स्वतंत्र वाटेवर चालण्यास सज्ज झाले आहेत.

हेही वाचा – Dashavatar in Oscars : मराठी सिनेमाचा जागतिक स्तरावर डंका; 'दशावतार' पोहोचला ऑस्करच्या मुख्य शर्यतीत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number