WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपचे ‘युजरनेम’ फिचर अडचणीत? सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकार ‘मेटा’ला नोटीस पाठवण्याची शक्यता

या नवीन फिचर अंतर्गत वापरकर्ते त्यांचा मोबाईल नंबर शेअर न करता केवळ एका युनिक 'युजरनेम'द्वारे (Username) इतरांशी संवाद साधू शकणार आहेत.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपचे ‘युजरनेम’ फिचर अडचणीत? सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकार ‘मेटा’ला नोटीस पाठवण्याची शक्यता

WhatsApp Username Feature: प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला अधिक बळकट करण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन फिचर अंतर्गत वापरकर्ते त्यांचा मोबाईल नंबर शेअर न करता केवळ एका युनिक 'युजरनेम'द्वारे (Username) इतरांशी संवाद साधू शकणार आहेत. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा देण्याचे आश्वासन देत असले तरी, भारत सरकारने या प्रणालीबाबत काही गंभीर चिंता व्यक्त केल्या आहेत.

ऑनलाइन फसवणुकीची चिंता आणि चौकशीची तयारी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन युजरनेम प्रणालीचा गैरवापर करून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढणार नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकार या फिचरची बारकाईने तपासणी करण्याची योजना आखत आहे. या सरकारी तपासणीदरम्यान जर सुरक्षिततेमध्ये कोणत्याही त्रुटी किंवा अनियमितता आढळल्या, तर सरकार व्हॉट्सॲपची मूळ कंपनी असलेल्या 'मेटा'ला (Meta) अधिकृत नोटीस बजावण्याची शक्यता आहे.

सायबर गुन्हेगारीचे आव्हान आणि मूल्यांकन
सध्या भारतामध्ये डिजिटल आणि ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार आणि भामटे लोकांना आर्थिक गंडा घालण्यासाठी बऱ्याचदा अशा मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा गैरवापर करतात. अशा परिस्थितीत, युजरनेम-आधारित प्रणालीमुळे या गुन्हेगारांची खरी ओळख पटवणे तपास यंत्रणांसाठी अधिक कठीण होणार की यांमुळे वापरकर्त्यांची सुरक्षा अधिक मजबूत होणार, याचे सविस्तर मूल्यांकन सरकारी अधिकाऱ्यांकडून केले जाईल.

कसे असेल व्हॉट्सॲपचे हे नवीन वैशिष्ट्य?
व्हॉट्सॲपने स्पष्ट केले आहे की, आगामी काही महिन्यांत हे युजरनेम वैशिष्ट्य जगभरातील वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जाईल. याद्वारे लोकांना आपले मोबाईल नंबर गुप्त ठेवण्याचा पर्याय मिळेल. वापरकर्ते ॲपच्या प्रोफाइल सेटिंग्जमध्ये जाऊन स्वतःचे युजरनेम सेट करू शकतील, परंतु ते तयार करणे पूर्णपणे ऐच्छिक असेल. तसेच, वापरकर्त्यांना हवे तेव्हा ते आपले युजरनेम बदलू किंवा डिलीटही करू शकतील.

हेही वाचा – WhatsApp Privacy Update: व्हॉट्सॲपचा ऐतिहासिक निर्णय; आता फोन नंबरशिवाय करता येणार चॅटिंग, सुरक्षेसाठी येणार आणलं 'हे' खास फीचर

नव्या फिचरचे स्वरूप आणि नियम
सुरक्षेच्या दृष्टीने आणि सुलभतेसाठी व्हॉट्सॲपचे हे नवीन युजरनेम वैशिष्ट्य खालील नियमांवर आधारित असेल:

– या प्रणालीमध्ये वापरकर्त्यांचे युजरनेम कमाल 35 अक्षरांपर्यंत लांब असू शकते.
– प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांच्या नावाचा गैरवापर टाळण्यासाठी, त्यांच्या नावाशी संबंधित युजरनेम्स आधीच आरक्षित (Reserved) ठेवली जातील.
– वापरकर्त्यांना त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) किंवा फेसबुकवर (Facebook) असलेले युजरनेमच व्हॉट्सॲपवर वापरण्याचा पर्याय देखील दिला जाईल.

दरम्यान, हे वैशिष्ट्य सुरुवातीच्या टप्प्यात केवळ मोबाईल ॲपवरच युजरनेम आरक्षित करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number