Middle East Conflict: ‘इराणने शरणागती पत्करली, तो आता…’; ट्रम्प यांचा मोठा दावा

&quotइराणने आता पूर्णपणे शरणागती पत्करली असून तो आता मध्य पूर्वेचा 'दादा' राहिला नसून 'हरलेला देश' ठरला आहे,&quot असे विधान ट्रम्प यांनी केले आहे.

Middle East Conflict: ‘इराणने शरणागती पत्करली, तो आता…’; ट्रम्प यांचा मोठा दावा

Middle East Conflict: मध्य पूर्वेतील युद्धाच्या भडक्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “इराणने आता पूर्णपणे शरणागती पत्करली असून तो आता मध्य पूर्वेचा ‘दादा’ राहिला नसून ‘हरलेला देश’ ठरला आहे,” असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून इराणच्या ढासळत्या स्थितीवर त्यांनी बोट ठेवले आहे.

‘ट्रुथ सोशल’वरून ट्रम्प यांचा दावा
अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले की, “वाईट पराभव झालेल्या इराणने शरणागती पत्करली आहे आणि आपल्या शेजारील देशांची माफी मागितली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे इराणने यापुढे गोळीबार न करण्याचे आश्वासन दिले आहे.” ट्रम्प यांनी पुढे दावा केला की, इराणला मध्य पूर्वेवर राज्य करायचे होते, पण हजारो वर्षांत पहिल्यांदाच त्याला आपल्या शेजाऱ्यांकडून पराभव पत्करावा लागला आहे. इराण आता शरणागती पत्करल्याशिवाय किंवा पूर्णपणे कोसळल्याशिवाय अनेक दशके सावरू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

इराणची माफी आणि पेझेश्कियान यांचे पाऊल
दुसरीकडे, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शुक्रवारी शेजारील देशांची जाहीर माफी मागत तणाव कमी करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. इराणच्या अंतरिम नेतृत्व परिषदेने जाहीर केल्यानुसार, जोपर्यंत इराणवर कोणाच्या हद्दीतून हल्ला होत नाही, तोपर्यंत तेहरान कोणत्याही शेजारील राज्यावर क्षेपणास्त्र हल्ला किंवा आक्रमकता दाखवणार नाही. गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह शेकडो लोक मारले गेल्याने इराणने आपला पवित्रा मवाळ केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – Iran Attack on Dubai Airport : इराण काय थांबत नसतंय! दुबईच्या एअरपोर्टवर ड्रोन हल्ला, अबूधाबीही निशाण्यावर,Video Viral

विनाशाचा इशारा आणि संभाव्य मोठे हल्ले
इराणने शांततेचे आवाहन केले असले तरी, ट्रम्प यांनी मात्र अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आज इराणवर मोठा हल्ला होईल. इराणच्या वाईट वर्तनामुळे आता अशी क्षेत्रे आणि लोकसंख्या लक्ष्यावर आहे ज्यांना यापूर्वी कधीही लक्ष्य मानले गेले नव्हते,” असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इराणच्या पूर्ण विनाशासाठी ही तयारी असल्याचे संकेत त्यांनी दिले असून, मध्य पूर्वेतील परिस्थिती आता अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number