इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठप्पा ठेवत ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, यातील एक जहाज थेट भारताच्या दिशेने येत होते. इराणने अलीकडेच एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांचे कमांडो समुद्रात जहाजांवर चढून त्यांना ताब्यात घेताना दिसत आहेत. ही घटना मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.
इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने Strait of Hormuz येथे काही जहाजे रोखून त्यांच्यावर ताबा घेतला. व्हिडीओमध्ये कमांडो जलद गतीने जहाजावर चढताना आणि नियंत्रण घेताना दिसतात. ही कारवाई अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
‘मरीन ट्रॅफिक’ने दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या जहाजांमध्ये MSC-FRANCESCA आणि EPAMINONDAS यांचा समावेश आहे. यातील EPAMINONDAS हे जहाज दुबईतील ‘जेबेल अली’ बंदरावरून गुजरातच्या (भारत) दिशेने निघाले होते. ही जहाजे आता इराणच्या बंदरांकडे नेली जात आहेत. भारताकडे येणारे जहाज अडवले गेल्याने या तणावाचे सावट आता प्रादेशिक व्यापारी मार्गांवरही स्पष्टपणे दिसू लागले आहे. यामुळे भारताच्या ऊर्जा आयातीवर आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकेच्या लष्कराने यापूर्वी इराणचे एक कंटेनर जहाज जप्त केले होते, तसेच हिंद महासागरात इराणच्या तेल व्यापाराशी संबंधित एका तेलवाहू जहाजावर कारवाई केली होती. दोन्ही देश आता एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी थेट लष्करी मार्गांचा अवलंब करत असल्याने जागतिक तेल बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून तेलाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
? BREAKING
First video of Iran Navy forces seizing vessels violating regulations and linked to Israel in the Strait of Hormuz. pic.twitter.com/Cya8tajjPy — IRIB (Islamic Republic of Iran Broadcasting) (@iribnews_irib) April 22, 2026