US Conflict With Iran: ‘युद्ध सुरू करण्यामागे अमेरिकेचा हा हेतू!’ इराणच्या प्रतिनिधीचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘भारत-चीनचाही असा संबंध’

इराणने हे युद्ध सुरू केले नसून, अमेरिका आणि इस्रायलनेच आक्रमक पवित्रा घेतल्याचे इराणचे अधिकारी इलाही यांनी स्पष्ट केले. इराण केवळ स्वतःचे आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करत आहे.

US Conflict With Iran: ‘युद्ध सुरू करण्यामागे अमेरिकेचा हा हेतू!’ इराणच्या प्रतिनिधीचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘भारत-चीनचाही असा संबंध’

US Conflict With Iran : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ लष्करी लढाईपुरता मर्यादित राहिला नसून, त्याला जागतिक राजकारणाचे गंभीर पैलू जोडले गेले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या भारतातील विशेष प्रतिनिधींनी या युद्धामागील एक धक्कादायक ‘भारत-चीन कनेक्शन’ उघड केले आहे. अमेरिकेला स्वतःचे जागतिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी भारत आणि चीनला उदयोन्मुख शक्ती बनण्यापासून रोखायचे आहे, असा खळबळजनक दावा इराणी अधिकाऱ्याने केला आहे.

भारत आणि चीनला रोखण्यासाठी युद्धाचा खेळ?
एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इराणचे प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, नजिकच्या भविष्यात भारत, चीन, रशिया आणि अमेरिका ही राष्ट्रं जगातील सर्वात शक्तिशाली शक्ती म्हणून उदयास येणार आहेत. मात्र, अमेरिकेला या वर्चस्वाच्या शर्यतीत कोणताही भागीदार नको आहे. विशेषतः भारत आणि चीनने शक्तिशाली सहकारी म्हणून पुढे येऊ नये, यासाठी अमेरिका मुद्दाम युद्धाला खतपाणी घालत असल्याचे इलाही यांनी म्हटले आहे. जागतिक शक्तींचा उदय रोखणे हाच वॉशिंग्टनचा मुख्य अजेंडा असल्याचा दावा त्यांनी केला.

आम्ही युद्ध सुरू केले नाही: इराणची भूमिका
इराणने हे युद्ध सुरू केले नसून, अमेरिका आणि इस्रायलनेच आक्रमक पवित्रा घेतल्याचे इलाही यांनी स्पष्ट केले. इराण केवळ स्वतःचे आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करत आहे. “तेच आमच्यावर हल्ले करत आहेत आणि बॉम्ब टाकत आहेत. आम्ही फक्त संरक्षणात्मक भूमिका घेत आहोत. एकदा त्यांनी युद्ध थांबवले की आम्हीही थांबवू,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांच्या विधानाला दुजोरा देत, इराण आता अमेरिका-इस्रायली आक्रमणाविरुद्ध दोन आघाड्यांवर लढत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Iran US Israel Conflict: इराणमधील ‘या’ छोट्याशा बेटावर अमेरिका-इस्रायल हल्ला करण्याचा विचारही करू शकत नाहीत; कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित

दोन युद्धांचा सामना आणि खोट्या बातम्या
अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी नमूद केले की, इराण सध्या एकाच वेळी दोन युद्धे लढत आहे. पहिले म्हणजे अमेरिका आणि इस्रायलशी सुरू असलेला थेट लष्करी संघर्ष आणि दुसरे म्हणजे ‘खोट्या बातम्यांविरोधातील युद्ध’ (War against fake news). जागतिक स्तरावर इराणची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःचे जागतिक स्थान टिकवून ठेवण्यासाठी अमेरिका संघर्षाचा वापर एक हत्यार म्हणून करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जागतिक वर्चस्वाची लढाई
अमेरिकेला भारतासारख्या देशांनी शक्तिशाली सहकारी बनणे मान्य नाही, कारण त्यामुळे त्यांचे एकतर्फी वर्चस्व कमी होईल. म्हणूनच आशियाई शक्तींना अस्थिर करण्यासाठी आणि स्वतःचे नियंत्रण कायम राखण्यासाठी अशा युद्धांना चिथावणी दिली जात असल्याचे इलाही यांनी सांगितले. या विधानामुळे आता जागतिक राजकारणात नवीन चर्चेला उधाण आले आहे. अमेरिका खरोखरच भारत आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला घाबरली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – Israel Attack on Iran: इराणमध्ये सत्तापालट आणि रक्तरंजित संघर्ष; नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी इस्रायली हल्ल्यात गंभीर जखमी?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number