Middle East Crisis: ‘इराणने भारतीय जहाजांवर हल्ला केला, आम्ही…’; भारताच्या दबावानंतर डोनाल्ड ट्रम्प बॅकफूटवर, संबंध सुधारण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन दलांनी भारतीय कर्मचाऱ्यांच्या ताफ्यातील एका जहाजावर हल्ला केला होता, ज्यामध्ये 3 भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Middle East Crisis: ‘इराणने भारतीय जहाजांवर हल्ला केला, आम्ही…’; भारताच्या दबावानंतर डोनाल्ड ट्रम्प बॅकफूटवर, संबंध सुधारण्याचा प्रयत्न

Middle East Crisis: भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत नाजूक आणि तणावपूर्ण वळणावर आहेत. काही दिवसांपूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन दलांनी भारतीय कर्मचाऱ्यांच्या ताफ्यातील एका जहाजावर हल्ला केला होता, ज्यामध्ये 3 भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेवर भारताने अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका घेत थेट अमेरिकन राजदूतांना पाचारण करून जाब विचारला होता. भारताच्या या तीव्र संतापामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ घटनेवर मौन बाळगणे पसंत केले असले, तरी आता ते बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांनी एक नवा आणि खळबळजनक दावा केला आहे की, काल रात्री इराणने भारतीय जहाजांवर ड्रोन हल्ला केला होता, जो अमेरिकन लष्कराने यशस्वीपणे हाणून पाडला.

'ट्रुथ सोशल'वरून इराणवर निशाणा; स्वतःला दाखवले रक्षक
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत 'Truth Social' प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे इराणला जागतिक पातळीवर खलनायक म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, "काल रात्री होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय जहाजांवर इराणकडून हल्ला करण्यात आला. परंतु अमेरिकन लष्कराने अत्यंत सतर्कता दाखवत हा प्रयत्न 100 टक्के निकामी केला." इराणला कडक शब्दांत इशारा देताना ते पुढे म्हणाले की, "इराणची अशी चिथावणीखोर कृती कधीही खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी आपली वागणूक तातडीने सुधारणे गरजेचे आहे." या विधानांद्वारे ट्रम्प आता स्वतःला भारतीय जहाजांचे रक्षक म्हणून प्रोजेक्ट करत आहेत, जेणेकरून अमेरिकन लष्कराचा भारतीय जहाजांना लक्ष्य करण्याचा कोणताही हेतू नव्हता, हे दाखवता येईल. मात्र, ज्या घटनेत 3 निष्पाप भारतीयांचा बळी गेला, त्या मुख्य मुद्द्यावर त्यांनी अद्यापही मौन राखले आहे.

इराणकडून ट्रम्प यांना मोठा धक्का; कराराचा दावा फेटाळला
या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा ट्रम्प यांनी इराणकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचाही उल्लेख केला. दिवसाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी इराणवर सर्वात विनाशकारी हल्ला करण्याची थेट धमकी दिली होती. मात्र, काही तासांनंतर त्यांनी घूमजाव करत एक अपडेट दिले की, "अमेरिकेने चर्चा केली असून इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाने एका मोठ्या कराराला दुजोरा दिला आहे; आता केवळ स्वाक्षरी होणे बाकी असून वेळ आणि जागा मी स्वतः ठरवेन." ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर काही मिनिटांतच इराणने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट केले की, "आमच्या बाजूने कोणत्याही कराराला अंतिम संमती देण्यात आलेली नाही." इराणच्या या अधिकृत भूमिकेमुळे ट्रम्प यांच्यावर नामुष्की ओढवली असून त्यांची मोठी थट्टा उडत आहे.

हेही वाचा – Iran – America War : युद्धाबाबत महत्त्वाचा करार, इराणच्या नेत्याची युद्धविरामाच्या कराराला मान्यता; ट्रम्प यांचा दावा

'इराणशी प्रामाणिक व्यवहार करणे अशक्य'; ट्रम्प यांचा संताप
इराणने जाहीरपणे खोटा पाडल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 'Truth Social'वर पोस्ट करत आपला तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिले, "इराणने फेक न्यूज माध्यमांकडे ज्या अटींची माहिती लीक केली आहे, त्यांचा प्रत्यक्ष लेखी स्वरूपात ठरलेल्या अटींशी दूरवरचाही संबंध नाही. कराराबाबत त्यांनी केलेले दयनीय दावे सत्यापासून पूर्णपणे दूर आहेत. अशा देशासोबत व्यवहार करणे ही अत्यंत अप्रामाणिक बाब आहे; त्यांच्याशी कोणताही प्रामाणिक करार करणे अशक्य असून ते पूर्णपणे अविश्वसनीय आहेत." इराणच्या या भूमिकेमुळे मध्य पूर्वेतील आणि भारत-अमेरिका संबंधांतील गुंतागुंत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number