Ebola outbreak 2026 : मोठा निर्णय! भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा 2.0’ बंधनकारक, काय आहे हा नियम?

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी 24 तास आधी हा फॉर्म भरणे अनिवार्य असणार आहे.

Ebola outbreak 2026 : मोठा निर्णय!  भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा 2.0’ बंधनकारक, काय आहे हा नियम?

Air Suvidha 2.0 Mandatory to Prevent Ebola Outbreak : आफ्रिकेमध्ये वेगाने पसरणाऱ्या घातक इबोला विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने विमानतळांवर कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 25 जून 2026 पासून ‘एअर सुविधा 2.0’ हे डिजिटल पोर्टल पुन्हा सक्रिय करत सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवासापूर्वी ऑनलाईन आरोग्य स्वयंघोषणापत्र भरणे कायदेशीररित्या बंधनकारक केले आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, मग त्यामध्ये युएई किंवा इतर कोणत्याही देशातून परतणाऱ्या भारतीय प्रवाशांचा समावेश असो, प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी 24 तास आधी हा फॉर्म भरणे अनिवार्य असेल. एअरपोर्टवरील गर्दी आणि वेळेची बचत टाळण्यासाठी प्रवाशांनी वेब चेक-इन करतानाच ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जागतिक आणीबाणी आणि भारताची आगाऊ खबरदारी
भारत सरकारने हा तातडीचा निर्णय घेण्यामागे जागतिक स्तरावरील एक गंभीर परिस्थिती कारणीभूत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 17 मे 2026 रोजी काँगो (DRC) आणि युगांडा देशांमधील इबोलाच्या उद्रेकाला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे. चिंताजनक बाब म्हणजे, हा इबोलाचा अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ‘बुंदिबुग्यो’ प्रकार आहे, ज्यावर सध्या कोणतीही प्रमाणित लस किंवा खात्रीशीर वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत. हा जीवघेणा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत भारतात दाखल होऊ नये, यासाठीच केंद्र सरकारने आधीच ही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.

हेही वाचा – Ram Mandir Donation Theft: राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट; ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांचा राजीनामा

डिजिटल फॉर्म आणि द्यावी लागणारी माहिती
या नवीन नियमानुसार, प्रवाशांना airsuvidha.civilaviation.gov.in या अधिकृत सरकारी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये प्रवाशांना मुख्यत्वे पुढील 3 बाबींची प्रामाणिक माहिती द्यावी लागेल:
– गेल्या 21 दिवसांतील त्यांचा प्रवासाचा इतिहास
– त्यांनी इबोला प्रभावित देशांना भेट दिली आहे का
– सध्या त्यांना ताप, शरीरातून रक्तस्त्राव होणे किंवा तीव्र अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे जाणवत आहेत का?
हा फॉर्म संपूर्णपणे डिजिटल असून विमानतळावर कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष कागदी फॉर्मची गरज भासणार नाही. प्रवाशांनी केवळ ऑनलाईन फॉर्मची डाऊनलोड केलेली प्रत विमानतळावरील ‘इंटरनॅशनल ट्रॅव्हल हेल्थ डेस्क’ किंवा इमिग्रेशन काउंटरवर दाखवणे आवश्यक आहे.

इबोलाचे गांभीर्य आणि प्रवाशांना सूचना
इबोला हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून तो बाधित व्यक्तीच्या लाळ, रक्त किंवा इतर शारीरिक द्रव्यांच्या थेट संपर्कात आल्याने पसरतो. गेल्या 5 दशकांमध्ये या भयानक आजारामुळे आफ्रिकन देशांमध्ये 15,000 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्याचा हा धोकादायक उद्रेक रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आफ्रिकन सिडीसीने संयुक्तपणे 512 दशलक्ष डॉलर्सचा आपत्कालीन निधी जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर, नुकताच काँगो, युगांडा किंवा दक्षिण सुदान या देशांमधून प्रवास करून भारतात येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर अतिरिक्त वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

हेही वाचा – Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील 6 शहीद वीरांची नावे प्रथमच समोर; यादी शेअर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number