Instagram Down: इन्स्टाग्राम ठप्प! जगभरातील लाखो युजर्सचा खोळंबा; 12 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी नोंदवली तक्रारी

ॲप आणि वेबसाइट दोन्हीवर तांत्रिक समस्या उद्भवल्याने युजर्सना त्यांचे फीड अ‍ॅक्सेस करता येत नव्हते, ज्यामुळे नवीन पोस्ट आणि अपडेट्स पाहणे कठीण झाले होते.<br/>

Instagram Down: इन्स्टाग्राम ठप्प! जगभरातील लाखो युजर्सचा खोळंबा; 12 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी नोंदवली तक्रारी

Instagram Down: जगातील सर्वात लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामची सेवा अचानक विस्कळीत झाल्याने जगभरातील लाखो वापरकर्त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ॲप आणि वेबसाइट दोन्हीवर तांत्रिक समस्या उद्भवल्याने युजर्सना त्यांचे फीड अ‍ॅक्सेस करता येत नव्हते, ज्यामुळे नवीन पोस्ट आणि अपडेट्स पाहणे कठीण झाले होते.

तांत्रिक बिघाडामुळे फीड झाले ठप्प
अनेक वापरकर्त्यांनी तक्रार केली की, इन्स्टाग्राम ॲप उघडत असूनही त्यावरील फीड लोड होत नव्हते. नवीन पोस्ट किंवा अपडेट्स पाहता येत नसल्यामुळे सोशल मीडियावर तक्रारींचा ओघ सुरू झाला. अनेक युजर्सना फक्त जुन्याच पोस्ट दिसत होत्या, तर काहींना ॲप वापरताना वारंवार 'एरर' येत होता.

डाऊनडिटेक्टरवर तक्रारींचा पाऊस
वेबसाइट आउटेजचा मागोवा घेणाऱ्या 'डाउनडिटेक्टर' या पोर्टलला सकाळी 9 वाजेपासूनच तक्रारींचे हजारो रिपोर्ट्स मिळण्यास सुरुवात झाली. फीड रिफ्रेश न होणे ही सर्वात मोठी समस्या होती. उपलब्ध माहितीनुसार, तांत्रिक बिघाड सुरू झाला तरी मेटा किंवा इंस्टाग्राम कंपनीकडून सुरुवातीला कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते.

जागतिक स्तरावर परिमाण; अमेरिका आणि भारताला फटका
या तांत्रिक समस्येचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला, जिथे सुमारे 12,000 हून अधिक वापरकर्त्यांनी अधिकृतपणे तक्रारी नोंदवल्या. भारतामध्येही साधारण 1000 वापरकर्त्यांना या अडचणीचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त युकेमधील युजर्सनीही सेवा विस्कळीत झाल्याची पुष्टी केली, ज्यावरून ही एक जागतिक तांत्रिक समस्या असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – Nasa Mars Mission New Photo: मंगळ ग्रहाचे गूढ उलगडणार; नासाने वीस वर्षांनंतर जाहीर केली लाल ग्रहाची नवीन आणि अत्यंत स्पष्ट छायाचित्रे

सेवा पूर्ववत झाल्याने दिलासा
सकाळी 9 वाजता सुरू झालेला हा गोंधळ साधारण 10:30 च्या सुमारास निवळण्यास सुरुवात झाली. तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर इंस्टाग्रामची सेवा हळूहळू पूर्ववत झाली आणि युजर्सना पुन्हा एकदा त्यांचे फीड रिफ्रेश करता येऊ लागले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number