कारवार : आयएनएस विक्रांत ही विमानवाहक नौका भारतीय नौदलाच्या पश्चिम तळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. भारतीय नौदलाची ताकद कशी वाढली पाहुयात आजच्या ग्राऊंड झिरोमध्ये….
शुक्रवारी भारताच्या पश्चिम तळात देशातील सर्वात आधुनिक आणि सर्वात मोठी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांत रुजू झाली…..दोन वर्ष सखोल चाचण्या केल्यानंतर ही नौका शुक्रवारपासून सेवेत रुजू झाली आहे….भारतीय नौदलाकडे असलेली ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही युद्धनौका २०१३ पासून नौदलाच्या ताफ्यात सेवा देत आहे…आता आयएनएस विक्रमादित्यसह आयएनएस विक्रांतही नौदलाच्या ताफ्यात रूजू झाली आहे…..आयएनएस विक्रांतची बांधणी २००९ मध्ये सुरू झाली आणि २०१३ मध्ये आयएनएस विक्रांतचे जलावतारण झाले…..२ सप्टेंबर २०२२ ला कोच्ची येथे आयएनएस विक्रांत दाखल झाली……..
सप्टेंबर २०२२ नंतर आयएनएस विक्रांतवर विमाने व हेलिकॉप्टरसाठी सज्जता केली जात होती….कारण हवाई मोहिमा आणि हवाई युद्धसज्जता ही एका विमानवाहू युद्धनौकेचा मुख्य कणा असतो….सर्व प्रकारची लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर दिवसा तसेच रात्री उड्डाण व खाली उतरविण्याचा यशस्वी सराव करण्यात आला. त्याआधारे ‘आयएनएस विक्रांत’ हवाई मोहीमसज्ज झाली. हवाई सज्जतेनंतर ‘आयएनएस विक्रांत’चे मागील वर्षी ताफ्यातील अन्य युद्धनौकांशी एकात्मिकरण सुरू झाले. कारण मोहिमेवर असताना या सर्व युद्धनौका आणि पाणबुड्या सोबत असतात….त्यामुळे आवश्यक त्या युद्ध व समुद्री मोहिमांच्या चाचण्या पूर्ण होऊन सर्व शक्तीनिशी ‘आयएनएस विक्रांत’ पश्चिम तळाच्या ताफ्यात रुजू झाली आहे….
भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेची कहाणी
विक्रांत देशाच्या सर्वात धाडसी पाउलांपैकी एक. २२ सप्टेंबर १९९५ मध्ये हर्क्युलस असे विक्रांत जहाजाचे नाव
१९५७ मध्ये भारताने हर्क्युलसला विकत घेतले ब्रिटनकडून…विकल घेताला जहाजाचे काम अपूर्ण, अर्धवट होते…. मग ४ मार्च १९६१ साली विक्रांत जहाजाला भारतीय सेवेत रूजू करण्यात आले…
विक्रांतचे ब्रीदवाक्य ऋग्वेदातील एक श्लोक आहे ते म्हणजे 'जयेम सं युधी स्पृधा' म्हणजेच 'लढण्याचे धाडस करतात त्यांच्यावर आम्ही विजय मिळवतो….'
१९७१ च्या युद्धात विक्रांत जहाजाने मोठी कामगिरी केली…
१९९७ मध्ये, विक्रांतला औपचारिकपणे निवृत्त करण्यात आले.
विमानवाहू जहाजाला समुद्रात तरंगणारे एअरफील्ड असेही संबोधले जाते. लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसह लष्करी विमाने वाहून नेण्यास आणि चालविण्यास सक्षम असलेली फ्लाइट डेक असलेली ही एक भव्य युद्धनौका आहे आणि त्यांना ऑनबोर्ड टेकऑफ आणि लँडिंग सुविधा देते.
INS विक्रांत, प्रथम स्वदेशी बनावटीची विमानवाहू वाहक आणि देशाच्या सागरी इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका कार्यान्वित झाल्यामुळे, भारताने विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या सक्षम देशांच्या निवडक गटात प्रवेश केला.
'आत्मनिर्भार भारत' ची सर्वात मोठी ताकद या निमित्ताने दिसतेय….
विमानवाहू युद्धनौका म्हणजे काय ?
विमानवाहू जहाज हे नौदलाच्या ताफ्याची ताकद असते.
नौदलाचे विमान लँड आणि टेकऑफ करण्यासाठी याचा वापर
समुद्राच्या मोठ्या भागावर लक्ष्य ठेवते.
देशाच्या समुद्री सीमांचे रक्षण करते.
देशाचे सामर्थ्य आणि शक्ती दाखवते.
मेड इन इंडिया मोहिमेअंतर्गत विकसित केलेली आयएनएस विक्रांत हा भारतासाठी मैलाचा दगड आहे. ही युद्धनौका म्हणजे समुद्रातला बाहुबली आहे. वीस हजार कोटी रुपये खर्चून बांधलेली ही युद्धनौका ५३ एकरांवर पसरलेली असून ती १५ मजली इमारतीइतकी उंच आहे.
भारतात निर्मित INS विक्रांत २६२ मी (865 ft) लांब आणि ६२ मी (203 ft) रुंद आहे आणि तिचे विस्थापन सुमारे ४३ हजार टन आहे आणि २८ सागरी मैल अर्थात नॉट्सचा निर्दिष्ट वेग आहे. वाहकाची शक्ती साडेात हजार नॉटिकल मैल आहे
या जहाजाची उंची सुमारे ५९ मीटर म्हणजेच १५ मजली इमारतीइतकी आहे आणि रुंदी ६२ मीटर इतकी आहे.
INS विक्रांत मध्ये अठरा मजले चौदा डेक, २३०० कंपार्टमेंट आहेत ज्यात महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष केबिनसह सुमारे १६०० क्रू मेंबर्स बसू शकतात. कॅप्टन विद्याधर हारके हे INS विक्रांतचे पहिले कमांडिंग ऑफिसर आहेत.
वाहकामध्ये ठेवलेल्या तीन पँट्रीमध्ये एकाच वेळी सुमारे ६०० कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय होऊ शकते. विमानवाहू जहाजामध्ये १६ खाटांचे रुग्णालय, २ ऑपरेशन थिएटर, आयसीयू आणि आयसोलेशन वॉर्ड देखील आहेत.
INS विक्रांत युद्धनौकेवर ८८ मेगावॅट क्षमतेच्या चार गॅस टर्बाइन बसवण्यात आल्या आहेत आणि तिचा कमाल वेग २८ नॉट्स इतका आहे. विक्रांतने गेल्या वर्षी २१ ऑगस्टपासून सागरी चाचण्यांचे अनेक टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. INS विक्रांतमध्ये ७६ टक्के स्वदेशी घटक आहेत आणि या युद्धनौकेमध्ये मिग-२९ लढाऊ विमाने, कामोव-३१, MH-६०R व्यतिरिक्त स्वदेशी बनावटीची प्रगत प्रकारची हलकी हेलिकॉप्टर्स (ALH) आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) समाविष्ट आहेत.
कमी जागेत टेक ऑफ आणि लँडिंग शक्य
कमी क्षेत्रात विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग करता यावे यासाठी आयएनएस विक्रांतची खास रचना करण्यात आली आहे. या युद्धनौकेचा पुढच्या भागात चढाव आहे, ज्याला STOBAR (शॉर्ट टेक-ऑफ बट अरेस्टेड लँडिंग) डिझाइन म्हणतात आणि याचा फायदा म्हणजे विमान कमी जागेत सहजपणे टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते.
युद्धजन्य परिस्थितीसाठी अत्याधुनिक शास्त्रांनी सज्ज आयएनएस विक्रांत हा इतका मोठा आहे की, त्याला युद्धादरम्यान लपविणे शक्य नाही. त्यामुळे शत्रूंचा सामना करता यावा यासाठी त्यात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. INS विक्रांतमध्ये ३२ मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे असतील. ती AK-६३० रोटरी तोफेने सुसज्ज असेल. याशिवाय, भारतीय अँटी मिसाइल नेव्हल डेकोय सिस्टमने सुसज्ज असेल, जे लेझर गाईडेड जहाजाकडे येणाऱ्या शत्रूंच्या क्षेपणास्त्राचे लक्ष भरकटवते.
INS विक्रांतच्या कार्यान्वित झाल्यामुळे, भारताकडे आता दोन सक्रिय विमानवाहू जहाजे आहेत. यामुळे त्याचे हिंदी महासागरातील वर्चस्व मजबूत झाले आहे आणि सागरी सुरक्षा वाढली आहे….लष्करी कारवायांव्यतिरिक्त, आयएनएस विक्रांतचा वापर गैर-लष्करी उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. यामध्ये नैसर्गिक आपत्तींच्या वेळी किंवा संकटकाळात परदेशातील प्रदेशातून लोकांना बाहेर काढणे समाविष्ट आहे….
भारतासाठी आयएनएस विक्रांतचे महत्त्व
INS विक्रांत हे भारतीय नौदलासाठी महत्वाचे आहे कारण राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक
भारतीय नौदलाच्या ब्लू वॉटर नेव्ही बनण्याच्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल
संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणाचे प्रतिनिधित्व
संरक्षण उत्पादनात भारताचे स्वावलंबन दर्शवते
भारताच्या बेटांची सुरक्षा सुनिश्चित होते.