Cancer Medicine Price Hike: कर्करोग रुग्णांना महागाईचा झटका; ‘या’ कारणामुळे औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

कार्बोप्लॅटिन आणि सिस्प्लाटिन यांसारख्या अत्यंत आवश्यक कर्करोगविरोधी औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची मागणी औषध उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Cancer Medicine Price Hike: कर्करोग रुग्णांना महागाईचा झटका; ‘या’ कारणामुळे औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

Cancer Medicine Price Hike: जीवघेण्या कर्करोगावर (कॅन्सर) उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. कार्बोप्लॅटिन आणि सिस्प्लाटिन यांसारख्या अत्यंत आवश्यक कर्करोगविरोधी औषधांच्या किमतीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची मागणी औषध उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत जागतिक स्तरावर अफाट वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

प्लॅटिनमच्या दरवाढीचा उत्पादनावर परिणाम
स्थानिक औषध कंपन्यांच्या दाव्यानुसार, कर्करोगाच्या औषधांमध्ये मुख्य घटक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'प्लॅटिनम' या धातूच्या किमती जागतिक बाजारपेठेत गगनाला भिडल्या आहेत. यामुळे उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत भू-राजकीय तणावामुळे प्लॅटिनमचे दर प्रति ग्रॅम 3,869 रुपयांवरून थेट 8,000 रुपयांवर पोहोचले आहेत. सध्याच्या सरकारी नियंत्रणानुसार असलेल्या किमतीत (Price Cap) औषध उत्पादन करणे आता कंपन्यांना तोट्याचे ठरू लागले आहे.

अत्यावश्यक औषधांचा पुरवठा धोक्यात?
सिप्ला, डॉ. रेड्डीज, झायडस आणि एमक्योर यांसारख्या दिग्गज औषध कंपन्यांनी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाकडे (NPPA) धाव घेतली आहे. या कंपन्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
मागणी: रुग्णांना विकल्या जाणाऱ्या कमाल किमतीत (MRP) किमान 50 टक्के वाढ करण्यात यावी.
इशारा: सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर या अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊन रुग्णांच्या उपचारांत खंड पडण्याची भीती उद्योग जगताने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Ammonia Gas Crisis: देशावरील संकट वाढतंय! तेल, गॅसनंतर आता अमोनियाचा भडका, एक सिलेंडर 15000 तर…, शीतगृह उद्योग संकटात

का महत्त्वाचे आहे हे औषध?
'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कार्बोप्लॅटिन हे औषध प्रगत टप्प्यातील अंडाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या (Lung Cancer) उपचारांसाठी अत्यंत मूलभूत मानले जाते. 'नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया' मध्येही याचा समावेश असून जागतिक स्तरावर याला 'लाईफ सेव्हिंग ड्रग्ज' म्हणून मान्यता आहे. जर ही दरवाढ लागू झाली, तर सर्वसामान्य कर्करोग रुग्णांच्या खिशावर याचा मोठा भार पडणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number