Jet Fuel Price Hike: महागाईचा विमानसेवेला मोठा फटका; इंधनाचे दर भडकल्याने विमान कंपन्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

विशेषतः 'होर्मुझ सामुद्रधुनी'मधील अनिश्चिततेचा फटका जागतिक बाजारपेठेला बसला असून, याचे गंभीर परिणाम आता युरोप, अमेरिका आणि आशियातील विमान वाहतुकीवर दिसू लागले आहेत.<br/>

Jet Fuel Price Hike: महागाईचा विमानसेवेला मोठा फटका; इंधनाचे दर भडकल्याने विमान कंपन्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Jet Fuel Price Hike:  जगभरातील हवाई प्रवास आता सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. जेट इंधनाच्या (ATF) किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे अनेक प्रमुख विमान कंपन्यांनी आपल्या विमानफेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमधील भू-राजकीय तणाव आणि तेलाच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. विशेषतः 'होर्मुझ सामुद्रधुनी'मधील अनिश्चिततेचा फटका जागतिक बाजारपेठेला बसला असून, याचे गंभीर परिणाम आता युरोप, अमेरिका आणि आशियातील विमान वाहतुकीवर दिसू लागले आहेत.

प्रमुख कंपन्यांकडून विमानफेऱ्यांत मोठी कपात
वाढत्या खर्चामुळे KLM, युनायटेड एअरलाईन्स, लुफ्थांसा आणि कॅथे पॅसिफिक यांसारख्या दिग्गज विमान कंपन्यांनी आपले वेळापत्रक मर्यादित केले आहे. इंधन कार्यक्षमता कमी असलेली जुनी विमाने जमिनीवर उभी करण्यात आली आहेत. आकडेवारीनुसार, मे महिन्यात जागतिक विमान वाहतूक क्षमतेत सुमारे 3 टक्क्यांची घट झाली असून, येत्या काळात ही कपात अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शहरांमधील परस्पर संपर्क व्यवस्था (Connectivity) कमकुवत होत चालली आहे.

प्रवाशांच्या खिशाला कात्री; तिकिटांचे दर कडाडले
विमानफेऱ्या कमी झाल्यामुळे उपलब्ध जागांची संख्या घटली असून तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी लांब पल्ल्याच्या प्रवासावर 400 डॉलर्सपर्यंत 'इंधन अधिभार' (Fuel Surcharge) लागू केला आहे. यामुळे प्रवाशांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. केवळ खर्चच नाही, तर युरोपसारख्या देशांमध्ये जेट इंधनाचा साठाही मर्यादित असल्याने भविष्यात विमान उड्डाणे पूर्णपणे ठप्प होण्याचे संकट निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Global Metal Market Trends : सर्वांचं लक्ष सोने-चांदीकडे, 'या' धातूने मारली बाजी; चीनची रणनीती आणि मध्य-पूर्वेतील हालचालींमुळे मोठी तेजी

 लहान शहरांची कनेक्टिव्हिटी धोक्यात
उन्हाळी पर्यटन हंगाम तोंडावर असतानाच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे जागतिक पर्यटन क्षेत्राला मोठा धोका निर्माण झाला आहे. नफा कमी असलेल्या मार्गांवरील सेवा कंपन्यांनी आधीच बंद केल्या आहेत, ज्याचा सर्वाधिक फटका लहान शहरांना बसला आहे. जर इंधनाचे दर लवकर खाली आले नाहीत, तर आगामी काळात हवाई प्रवास अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number