Indonesia School Building Collapse: इंडोनेशियातील जावा बेटावरील सिदोआरजो येथील अल खोजिनी इस्लामिक बोर्डिंग स्कूलच्या इमारतीचा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंदाजे 65 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
हेही वाचा – Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानच्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी
बचावकार्य रात्रभर सुरू ठेवण्यात आले असून, पोलीस, सैनिक आणि बचावकर्ते खोदकाम करत आहेत. विद्यार्थ्यांना ऑक्सिजन आणि पाणीपुरवठा केला जात आहे, आणि अद्याप किती मुले जिवंत आहेत, याबाबत निश्चित माहिती नाही. शाळेच्या कॅम्पसमध्ये कमांड पोस्टवर सूचना लावून मुलांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. बहुतेक विद्यार्थी इयत्ता 7 वी ते 11वीतील आहेत. त्यांचे कुटुंबीय रुग्णालय आणि घटनास्थळी जमून मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत.
? BREAKING School building collapses in Indonesia — around 65 students trapped under debris, local officials say. Rescue operations underway.#Indonesia #BreakingNews pic.twitter.com/5vL8MJsX6I — Breaking News World (@WorldAlertHi) September 30, 2025
बचाव कार्याचे नेतृत्व करणारे अधिकारी नानांग सिगिट यांनी सांगितले की, ढिगारा इतका मोठा आणि जड आहे की तो कापण्यासाठी मशीनचा वापर करावा लागेल, ज्यामुळे कामामध्ये विलंब झाला आहे. पोलीस विभागाचे प्रवक्ते ज्युल्स अब्राहम अबास्ट म्हणाले की, जुनी इमारत फक्त दोन मजलींच्या भाराला आधार देऊ शकत होती, पण परवानगीशिवाय दोन मजली जोडल्याने पाया कोसळला आणि संपूर्ण इमारत कोसळली.