Fire : सात मजली इमारत आगीच्या विळख्यात; 20 जणांचा होरपळून मृत्यू, धुरामुळे बचावकार्यात अडथळे

समोर आलेल्या फुटेजमध्ये आग इमारतीत पसरल्याचे दिसत आहे. काही लोकांना अग्निशमन दलाच्या शिडीच्या मदतीने बाहेर काढताना दिसत आहेत.

Fire :  सात मजली इमारत आगीच्या विळख्यात; 20 जणांचा होरपळून मृत्यू, धुरामुळे बचावकार्यात अडथळे

Indonesia Fire : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये (Jakarta) मंगळवारी दुपारी एका सात मजली कार्यालयाच्या (Seven-storey Office Massive Fire) इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत (Tragic Accident) आतापर्यंत किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग इतक्या वेगाने पसरली की काही मिनिटांतच धुराने संपूर्ण परिसर व्यापला गेला.

जेवणाच्या सुट्टीत घडला मोठा अनर्थ
ही घटना जकार्ताच्या एका गजबजलेल्या व्यावसायिक परिसरात (Jakarta Busy Business Area) घडली. आग लागताच आजूबाजूच्या लोकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली आणि काही क्षणातच संपूर्ण इमारतीत पसरली. दुर्घटनेच्या वेळी अनेक कर्मचारी जेवणाची सुट्टी (Lunch Break) असल्याने जेवण करत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे वरच्या मजल्यांवर अडकलेल्या लोकांना तेथून बाहेर निघण्यास वेळ मिळालाच नाही.

धुरामुळे बाहेर पडणे झाले कठीण
भीषण आगीच्या उंच ज्वाळा (Jakarta High Flames) आणि सतत निघणाऱ्या धुरामुळे कार्यालयाच्या इमारतीतून बाहेर पडणे अत्यंत कठीण झाले होते. तसेच बचावकार्य (Jakarta Rescue Operation) करणेही खूप अवघड झाले. जकार्ता पोलीस विभागाचे प्रमुख सुसात्यो पुर्नोमो कोंड्रो यांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आता आग आटोक्यात आणण्यात आली आहे, पण इमारतीच्या आत अडकलेल्या लोकांचा शोध अजूनही सुरू आहे.

हेही वाचा – Japan Earthquake Update : जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीच्या लहान लाटाही

इमारत कोसळण्याची भीती
सुसात्यो पुर्नोमो कोंड्रो यांनी सांगितले की, सर्व मजल्यांची तपासणी केली जात आहे आणि मृतदेह (Jakarta Fire Dead Bodies) बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अनेक मजल्यांमध्ये धूर भरलेला असल्याने आणि आग लागल्यामुळे इमारत कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे बचावकार्य अत्यंत सावधगिरीने केले जात आहे. स्थानिक वाहिनी कोम्पास टीव्हीने (Kompas TV) या घटनेचे व्हिडिओ फुटेज समोर आणले आहे.

ड्रोन सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे कार्यालय
समोर आलेल्या फुटेजमध्ये आग इमारतीत पसरल्याचे दिसत आहे. काही लोकांना अग्निशमन दलाच्या शिडीच्या मदतीने बाहेर काढताना आणि अनेक मृतदेहांच्या बॅग इमारतीतून बाहेर नेताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार, आग लागलेली इमारत टेरा ड्रोन इंडोनेशियाच्या (Terra Drone Indonesia) कार्यालयासाठी वापरली जात होती. ही कंपनी जपानच्या टेरा ड्रोन कॉर्पोरेशनची (Japan’s Terra Drone Corporation) सहयोगी कंपनी असून, खाणकाम आणि शेतीसारख्या क्षेत्रांसाठी ड्रोन सेवा (Indonesia Drone Services) पुरवते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता (Indonesia Death Toll likely to rise) आहे.

हेही वाचा – Goa Club Fire Incident: गोवा आग दुर्घटनेतील क्लब मालक थायलंडला फरार, फुकेतमध्ये असल्याची माहिती समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number