Underwater Tunnel: भारताचा ऐतिहासिक प्रकल्प, ब्रह्मपुत्रा नदीच्या पोटातून एकाचवेळी धावणार कार अन् रेल्वे; ‘ट्विन ट्यूब’ बोगद्याला हिरवा कंदील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने आसाममधील ब्रह्मपुत्र नदीखाली 15.79 किमी लांबीच्या रस्ता-कम-रेल्वे (Road-cum-Rail) बोगद्याच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे.

Underwater Tunnel: भारताचा ऐतिहासिक प्रकल्प, ब्रह्मपुत्रा नदीच्या पोटातून एकाचवेळी धावणार कार अन् रेल्वे; ‘ट्विन ट्यूब’ बोगद्याला हिरवा कंदील

Underwater Tunnel : भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने आसाममधील ब्रह्मपुत्र नदीखाली 15.79 किमी लांबीच्या रस्ता-कम-रेल्वे (Road-cum-Rail) बोगद्याच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. गोहपूर ते नुमालीगड या राष्ट्रीय महामार्ग-15 विभागात हा 4-लेन, प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड प्रकल्प उभारला जाणार आहे. एकूण 18,662 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प अभियांत्रिकी खरेदी बांधकाम (EPC) तत्त्वावर पूर्ण केला जाईल.

6 तासांचा प्रवास आता काही मिनिटांत; 240 किमीचे अंतर घटणार
सध्या राष्ट्रीय महामार्ग-715 वरील नुमालीगड आणि राष्ट्रीय महामार्ग-15 वरील गोहपूर यांच्यातील अंतर तब्बल 240 किमी आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि विश्वनाथ शहरातून जाणाऱ्या या प्रवासासाठी साधारण 6 तास लागतात. मात्र, हा बोगदा तयार झाल्यानंतर हे अंतर आणि वेळ कमालीची कमी होणार आहे. हा 'ट्विन-ट्यूब' रस्ता-कम-रेल्वे बोगदा भारतातील पहिला आणि जगातील अशा प्रकारचा केवळ दुसरा प्रकल्प ठरेल, ज्यामुळे ईशान्य भारताच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी क्रांती होईल.

ईशान्य भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासाला गती
या प्रकल्पाचा फायदा केवळ आसामलाच नाही, तर अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि इतर ईशान्येकडील राज्यांनाही होणार आहे. यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढून लॉजिस्टिक्स खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. ब्रह्मपुत्रेखालून रेल्वे आणि गाड्या एकाच वेळी धावणार असल्याने या प्रदेशातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला नवी गती मिळेल. हा प्रकल्प सामरिकदृष्ट्याही भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा – PM Modi Plane Emergency Landing : ऐतिहासिक क्षण! टेस्टिंग नाही, थेट ट्रायल…; मोदींच्या विमानाचं हायवेवर इमर्जन्सी लॅंडिंग, व्हिडीओ एकदा पाहाच

महामार्ग आणि रेल्वेचे अनोखे जाळे; मल्टि-मॉडल एकात्मता
हा प्रकल्प दोन मोठे राष्ट्रीय महामार्ग (NH-15 आणि NH-715) आणि दोन प्रमुख रेल्वे मार्गांना (रंगिया-मुकोंगसेलेक आणि फुरकाटिंग-मारियानी लूप लाइन) एकमेकांशी जोडेल. या माध्यमातून 11 आर्थिक नोड्स, 3 सामाजिक नोड्स, 2 पर्यटन स्थळे आणि 8 लॉजिस्टिक्स नोड्सना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच 4 रेल्वे स्थानके, 2 विमानतळ आणि 2 अंतर्देशीय जलमार्गांशी हा मार्ग जोडला गेल्यामुळे प्रवासी आणि मालाची वाहतूक अत्यंत जलद आणि सुलभ होईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number