Indian Railways Theft : प्रवाशांचा रेल्वेला कोट्यवधींचा चुना! तब्बल 1.27 कोटींचे 46 लाख टॉवेल्स आणि 41 लाख बेडशीट्स चोरले; धक्कादायक आकडेवारी समोर

प्रवाशांच्या या अजब चोरी घटनांनंतर रेल्वेचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून याची वसुली करत आहे. या गरीब कर्मचाऱ्यांना विनाकारण मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

Indian Railways Theft : प्रवाशांचा रेल्वेला कोट्यवधींचा चुना! तब्बल 1.27 कोटींचे 46 लाख टॉवेल्स आणि 41 लाख बेडशीट्स चोरले; धक्कादायक आकडेवारी समोर

Theft in Indian Railways : भारतीय रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यांमधून प्रवास करणाऱ्या उच्चभ्रू प्रवाशांच्या चोरीची एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 ते मे 2026 या साडेचार वर्षांच्या कालावधीत प्रवाशांनी तब्बल 1 कोटी 27 लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. या आकडेवारीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे, रेल्वेने प्रवास करणाऱ्या दर 1000 प्रवाशांमागे सरासरी 1 प्रवासी एसी कोचमधील बेडशीट, ब्लँकेट किंवा टॉवेल्स सारख्या वस्तू स्वतःसोबत घरी घेऊन जातो. वर्ष 2022 ते 2025 या काळात रेल्वेतील या चोऱ्यांच्या प्रमाणात तब्बल 56 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

चोरी प्रवाशांची पण फटका मात्र गरीब कर्मचाऱ्यांच्या खिशाला
प्रवाशांच्या या अजब चोरीमुळे रेल्वेचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्यांना सुमारे 104.51 कोटी रुपयांचे अवाढव्य नुकसान सहन करावे लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कंत्राटदार या नुकसानीची भरपाई थेट एसी डब्यांमध्ये तैनात असलेल्या गरीब अटेंडंट्स आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून करतात. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील एका सुपरवायझरने सांगितले की, एका दिवसाला 700 रुपये कमावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा 2000 ते 3000 रुपये केवळ या चोऱ्यांमुळे कापले जातात. 5 रेल्वे गाड्यांमधील 60 कर्मचाऱ्यांकडून चोरीला गेलेल्या प्रत्येक वस्तूचे पैसे वसूल केले जातात. यात एका ब्लँकेटचे 343 रुपये, चादरीचे 198 रुपये, उशीचे 115 रुपये, उशीच्या कव्हरचे 55 रुपये आणि 1 टॉवेलचे 48 रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जातात. या त्रासामुळे अनेक कंत्राटदारांना आपले 3 वर्षांचे कंत्राट अवघ्या 14 महिन्यांतच थांबवावे लागले आहे.

हेही वाचा – पेन्शन की जॅकपॉट? बँकेतून पैसे काढायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यात आढळले 759 कोटी रुपये

टॉवेल्स आणि बेडशीट्स चोरीत अव्वल; दिल्ली अन् बिकानेरमध्ये सर्वाधिक चोऱ्या
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, चोरल्या गेलेल्या वस्तूंमध्ये सर्वाधिक संख्या टॉवेल्सची असून, 4 वर्षांत तब्बल 46.54 लाख टॉवेल्स गायब झाले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 41.13 लाख बेडशीट्स, त्यानंतर 23.59 लाख उश्यांचे कव्हर, 12.95 लाख ब्लँकेट्स आणि 2.76 लाख उश्यांची चोरी झाली आहे. सर्वाधिक चोऱ्यांची नोंद बिकानेर आणि रांची येथे झाली आहे. एकट्या बिकानेर विभागातून 25.76 लाख वस्तू चोरीला गेल्या, ज्यात सर्वाधिक 12.42 लाख बेडशीट्सचा समावेश होता. याशिवाय, दिल्ली, मुंबई, दानापूर, अहमदाबाद, जयपूर, सोनापूर, बिलासपूर, जोधपूर, समस्तीपूर येथे चोऱ्या झाल्या आहेत. सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे, दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली आणि पालक्काड या 2 विभागांमध्ये चोरीची एकही घटना नोंदवलेली नाही.

रेल्वे प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये; कर्मचाऱ्यांचा सहभाग नसल्याचा खुलासा
वाढत्या चोऱ्यांच्या या गंभीर प्रकरणाची रेल्वे मंत्रालयाने तात्काळ दखल घेतली आहे. रेल्वेने अधिकृत प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे की, प्रवाशांकडून होणारी ही चोरी रोखण्यासाठी विविध कडक उपाययोजना केल्या जात असून दोषी प्रवाशांवर कडक कारवाई करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेकदा रेल्वेच्याच कर्मचाऱ्यांच्या संगनमताने या चोऱ्या होतात असा संशय व्यक्त केला जात होता, मात्र रेल्वेने या चोरीच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याचा किंवा अटेंडंटचा सहभाग असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असे स्पष्ट करत आपल्या कर्मचाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price : होर्मुझ बंदचा पुन्हा फटका! इंधन दरांचा भडका; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number