Rafale Deal: 114 ‘राफेल’ लढाऊ विमानांमुळे वाढणार भारतीय हवाई दलाची ताकद; भारताच्या वर्चस्वाने पाकिस्तान धास्तावला

आर्थिक वर्ष 2026-27 दरम्यान संरक्षण क्षेत्रातील अनेक मोठे करार अंतिम केले जाणार असून, यामध्ये 114 बहुउद्देशीय 'राफेल' लढाऊ विमानांच्या खरेदीचा समावेश आहे.

Rafale Deal: 114 ‘राफेल’ लढाऊ विमानांमुळे वाढणार भारतीय हवाई दलाची ताकद; भारताच्या वर्चस्वाने पाकिस्तान धास्तावला

Rafale Deal: भारतीय हवाई दलाची (IAF) प्रहारक्षमता कैक पटीने वाढवण्यासाठी केंद्र सरकार आगामी काळात अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. आर्थिक वर्ष 2026-27 दरम्यान संरक्षण क्षेत्रातील अनेक मोठे करार अंतिम केले जाणार असून, यामध्ये 114 बहुउद्देशीय 'राफेल' लढाऊ विमानांच्या खरेदीचा समावेश आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारताचे हवाई वर्चस्व प्रस्थापित होणार असून, शेजारील शत्रू राष्ट्रांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संरक्षण मंत्रालयाने संसदीय स्थायी समितीला या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

हवाई दलाच्या अर्थसंकल्पात 37 टक्क्यांची भरघोस वाढ
हवाई दलाच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सरकारने भांडवली अर्थसंकल्पात (Capital Budget) गेल्या वर्षाच्या तुलनेत 37.03 टक्क्यांची मोठी वाढ केली आहे. या वाढीव निधीमुळे प्रलंबित असलेले संरक्षण करार मार्गी लागणार आहेत. सुमारे 3.25 लाख कोटी रुपये खर्चून 114 राफेल विमाने खरेदी केली जाणार आहेत. या कराराचे वैशिष्ट्य म्हणजे 'मेक इन इंडिया'ला चालना देण्यासाठी ही विमाने फ्रान्समधील कंपनीच्या सहयोगाने भारतातच तयार केली जातील, ज्यामुळे देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी क्रांती होईल.

मालवाहू विमानांचा ताफाही होणार अद्ययावत
केवळ लढाऊ विमानेच नव्हे, तर हवाई दलाने आपल्या मालवाहू क्षमतेतही सुधारणा करण्याचे निश्चित केले आहे. जुन्या होत चाललेल्या 'An-32' विमानांच्या जागी 60 नवीन मध्यम मालवाहू विमाने (MTA) खरेदी केली जाणार आहेत. या 1 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत 12 विमाने थेट खरेदी केली जातील, तर उर्वरित 48 विमानांची निर्मिती भारतातच केली जाईल. यामुळे भारतीय हवाई दलाची रसद पुरवठा करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

शत्रूच्या हालचालींवर 'तिसरी नजर'
आधुनिक युद्धाचे स्वरूप लक्षात घेता, 'एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल' (AEW&C) प्रणाली, हवेतच इंधन भरण्याची सुविधा (Flight Refuelers) and इलेक्ट्रॉनिक गुप्तचर मंचावर विशेष भर दिला जात आहे. या प्रणालींमुळे शत्रूच्या सीमा ओलांडण्यापूर्वीच त्यांच्या हालचाली टिपणे शक्य होईल. संसदीय समितीनेही सध्याच्या जागतिक भू-राजकीय स्थितीचा विचार करता, आधुनिक शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी दिलेल्या निधीचा प्रभावी वापर करण्याची सूचना हवाई दलाला केली आहे.

हेही वाचा – Iran Israel US War: 'डोक्याच्या बदल्यात डोकं…', ट्रम्प यांच्या चर्चेच्या दाव्यावर इराणचा अमेरिकेला थरकाप उडवणारा इशारा

'आत्मनिर्भरते'साठी एरोस्पेस डिझाइन संचालनालयाची स्थापना
संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी हवाई दलाने 'एरोस्पेस डिझाइन संचालनालय' (DAD) स्थापन केले आहे. हे संचालनालय स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विविध संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांशी समन्वय साधण्याचे काम करेल. यामुळे भविष्यात भारताला लढाऊ विमाने आणि इतर तांत्रिक साहित्यासाठी परकीय देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. भारताच्या या वाढत्या लष्करी ताकदीमुळे आशियाई उपखंडात भारताचे स्थान अधिक बळकट झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number