भारताने उधळला पाकिस्तानचा डाव! अमृतसरमध्ये हवेतचं पाडले पाकिस्तानी क्षेपणास्त्र

भारताने पाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच पाडण्यात आले. पंजाबमधील सीमेजवळील अमृतसरमध्ये भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडले.

भारताने उधळला पाकिस्तानचा डाव! अमृतसरमध्ये हवेतचं पाडले पाकिस्तानी क्षेपणास्त्र
Edited Image, X

अमृतसर: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आता अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने भारतावर 'क्षेपणास्त्र' डागण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताने पाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच पाडण्यात आले.
पंजाबमधील सीमेजवळील अमृतसरमध्ये भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडले. पंजाब पोलिसांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आले. 

भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला – 

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानचा तणाव वाढला आहे. 22 एप्रलि रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा भारताने बुधवारी बदला घेतला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये घुसून हवाई हल्ले केले आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

हेही वाचा – उत्तरकाशीतील गंगनीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 6 प्रवाशांचा मृत्यू

भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण – 

या हल्ल्यात, भारताने स्कॅल्प डीप-स्ट्राइक क्रूझ क्षेपणास्त्रे, हॅमर स्मार्ट वेपन सिस्टम, गाईडेड बॉम्ब किट आणि एक्सकॅलिबर दारूगोळा फायर करणाऱ्या M777 हॉवित्झर तोफांचा वापर करून दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर अचूक हल्ला केला. भारताच्या या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

हेही वाचा – Operation Sindoor: सॅटेलाइट फोटोने उघड केलं पाकिस्तानचं विध्वंसित रूप

पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार – 

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दररोज नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करत आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतीय चौक्या तसेच निवासी भागातील नागरिकांना लक्ष्य करत आहे. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पूंछमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, या गोळीबारात 44 जण जखमी झाले आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number