PM Modi Kurukshetra Speech: गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त कुरुक्षेत्रात आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून शीख गुरूंच्या बलिदानाला अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ विशेष स्मारक नाणे आणि टपाल तिकिट जारी केले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत घाबरत नाही आणि थांबत नाही. गुरु तेग बहादूर यांचे साहस, त्याग आणि अढळ भूमिका हे आपल्या राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत.”
गुरु तेग बहादूरांचे बलिदान आजही मार्गदर्शक
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी मुघल आक्रमणाच्या काळातील ऐतिहासिक परिस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की त्या काळात काश्मीरमधील हिंदूंना जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत होता. मदतीसाठी आलेल्या पीडितांच्या विनंतीवर गुरु तेग बहादूर यांनी निर्भयतेने उत्तर दिले होते.
कुरुक्षेत्राची पवित्र भूमी
पंतप्रधान मोदी म्हणाले की कुरुक्षेत्रात उभे राहून भगवान श्रीकृष्णांनी सत्य आणि न्यायाच्या रक्षणाचे महत्त्व सांगितले. याच पवित्र भूमीला शीख परंपरेचा अमूल्य वारसा लाभला आहे. मोदी म्हणाले, गुरु तेग बहादूरांसारखी व्यक्तिमत्त्वे इतिहासात विरळच जन्माला येतात. त्यांनी भिंतीत चिरडले जाणे स्वीकारले, पण धर्माचा व कर्तव्याचा मार्ग सोडला नाही.
#WATCH | Kurukshetra, Haryana | Speaking at the 350th Shaheedi Diwas of Sri Guru Tegh Bahadur Ji, Prime Minister Narendra Modi says, "… The cruel Aurangzeb ordered Guru Tegh Bahadur's imprisonment. However, Guru Tegh Bahadur himself announced his intention to go to Delhi.… https://t.co/032Rctwwzu pic.twitter.com/yQTcUVBzo6 — ANI (@ANI) November 25, 2025
गुरू परंपरेच्या तीर्थस्थानांचा विकास
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, केंद्र सरकार गुरु परंपरेशी जोडलेल्या सर्व महान स्थळांच्या आधुनिक विकासासाठी कटिबद्ध आहे. आमच्या सरकारने गुरुंच्या प्रत्येक तीर्थस्थळाला आधुनिक भारताच्या रूपाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कर्तारपूर कॉरिडॉरचे काम असो, हेमकुंड साहिबमधील रोपवे प्रकल्पाचे बांधकाम असो किंवा आनंदपूर साहिबमधील विरासत-ए-खालसा संग्रहालयाचा विस्तार असो, आम्ही आमच्या गुरुंच्या गौरवशाली परंपरेला आमचा आदर्श मानून ही सर्व कामे पूर्ण निष्ठेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.