Indian Economy: भारताची ऐतिहासिक झेप ! जपानला मागे टाकून भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, भारताने आता जपानला मागे टाकले असून भारत जगातील 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.

Indian Economy: भारताची ऐतिहासिक झेप ! जपानला मागे टाकून भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

Indian Economy: सरत्या वर्षाला निरोप देताना भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, भारताने आता जपानला मागे टाकले असून भारत जगातील 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताचा विकासदर आणि आर्थिक लवचिकता पाहून जागतिक संस्थांनीही भारताच्या प्रगतीवर शिक्कामोर्तब केले आहे.

4.18 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार

सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार, भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आता 4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. या कामगिरीसह भारताने जपानला पाचव्या स्थानावर ढकलले आहे. भारताचे पुढील लक्ष्य आता जर्मनी असून, 2030 पर्यंत जर्मनीला मागे टाकून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा – Warren Buffett Retirement : गुंतवणुकीचे 'बादशाह' वॉरन बफेट उद्या निवृत्त होणार! त्यांच्या झळाळत्या कारकीर्दीतील 5 मौल्यवान आर्थिक धडे

जगातील टॉप 5 अर्थव्यवस्था 

1. अमेरिका
2. चीन
3. जर्मनी
4. भारत (4.18 ट्रिलियन डॉलर्स)
5. जपान

2030 पर्यंत 7.3 ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य

सरकारने विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील 2.5 ते 3 वर्षांत भारत जर्मनीला तिसऱ्या स्थानावरून हटवेल. 2030 पर्यंत भारताचा जीडीपी 7.3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत विकासदराने गेल्या 6 तिमाहींचा उच्चांक गाठला आहे, जे जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताची मजबुती दर्शवते.

हेही वाचा – Credit Card : क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनो लक्ष द्या! नव्या वर्षात 'या' 2 मोठ्या बँकांचे नियम बदलणार, काय होईल परिणाम?

जागतिक संस्थांचा भारतावर विश्वास

अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताच्या विकासदराबाबत सकारात्मक अंदाज वर्तवले आहेत:

जागतिक बँक: 2026 मध्ये 6.5 टक्के वाढीचा अंदाज.
मूडीज: 2026 मध्ये 6.4 टक्के आणि 2027 मध्ये 6.5 टक्के वाढीसह भारत G20 मध्ये आघाडीवर राहील.
आशियाई विकास बँक (ADB): 2025 साठी 7.2 टक्के वाढीचा अंदाज.
फिच: ग्राहकांची मागणी वाढल्याने 2026 साठी 7.4 टक्के वाढीचा अंदाज.
आशियाई विकास बँक: 2025 साठी 6.6 टक्के आणि 2026 साठी 7.2 टक्के वाढीचा अंदाज.

2047 कडे वाटचाल

भारताने केवळ वाढीचा वेगच राखला नाही, तर स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत 'उच्च मध्यम उत्पन्न' देशाचा दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. मजबूत खाजगी उपभोग आणि संरचनात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने प्रगती करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number