Incredible India 2.0 : भारतीय पर्यटनाचे (Indian Tourism) आयकॉनिक अभियान 'इन्क्रेडिबल इंडिया' (Incredible India) मध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. विदेशी पर्यटकांना (Foreign Tourists) भारताकडे आकर्षित करण्यात या अभियानाने मोठी भूमिका बजावली असली तरी, काळानुसार त्याचा प्रभाव कमी झाला आहे. आता पर्यटन मंत्रालय या अभियानाचे मोठे डिजिटल रीब्रँडिंग (Digital Rebranding) करणार आहे. 2026 च्या सुरुवातीला हे नवीन डिजिटल रिवाइव्हल कॅम्पेंन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
तंत्रज्ञान आणि डेटाचा मोठा वापर
हा नवा बदल केवळ ब्रँडिंगपुरता मर्यादित नसून, तो अधिक चांगल्या प्रकारे, डिजिटल (Digital) आणि डेटा-ड्रिव्हन असणार आहे. मंत्रालय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून पर्यटकांच्या आवडीचे मॅपिंग करेल, तर बिग डेटा (Big Data) च्या मदतीने लक्ष्यित बाजारपेठांमध्ये आपली पोहोच वाढवेल. तसेच, तरुण प्रवाशांना जोडण्यासाठी कंटेंट क्रिएटर्स (Content Creators) आणि इन्फ्लुएन्सर्स सोबत नवीन सहयोग करण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रालयाने Expression of Interest देखील जारी केले आहे.
जागतिक स्तरावर यशस्वी अभियानाची सुरुवात
'इन्क्रेडिबल इंडिया' अभियानाची सुरुवात 2002 मध्ये झाली होती आणि ते जगातील सर्वात यशस्वी पर्यटन अभियानांपैकी एक म्हणून गणले जाते. 2017 मध्ये या अभियानाला रिफ्रेश करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्याचे अपेक्षित परिणाम मिळाले नव्हते. इंडस्ट्रीकडून या अभियानात आधुनिक आणि डेटा-आधारित बदलांची मागणी दीर्घकाळापासून होत होती. याच कारणामुळे यावेळी होणारे डिजिटल रिवाइव्हल जास्त चांगल्या प्रकारचे आणि तंत्रज्ञान-आधारित असेल.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत वाढ करणे लक्ष्य
'इन्क्रेडिबल इंडिया' मध्ये हे मोठे बदल घडवून आणण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. देशांतर्गत पर्यटनात (Domestic Travel) वाढ झाली असली तरी, आंतरराष्ट्रीय पर्यटकांची (International Tourists) संख्या अजूनही 'प्री-कोविड' (Pre-Covid) पातळीवर पोहोचलेली नाही. त्यामुळे, भारताचे पर्यटन क्षेत्र पूर्ववत करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर देशाची आधुनिक ओळख दर्शवण्यासाठी 'इन्क्रेडिबल इंडिया' ला नवीन आणि आधुनिक रूपात जगासमोर सादर करणे अत्यंत आवश्यक मानले जात आहे.