Shocking! घरातच केली तब्बल 309 अजगरांची पैदास; वाढीव वीज बिलामुळे उघडकीस आले वन्यजीव तस्करीचे मोठे रॅकेट

प्लास्टिकच्या शेकडो कंटेनर्समध्ये हे अजगर कोंडून ठेवण्यात आले होते. या सर्व सापांची रवानगी आता स्थानिक प्राणीसंग्रहालयात करण्यात आली आहे.

Shocking! घरातच केली तब्बल 309 अजगरांची पैदास; वाढीव वीज बिलामुळे उघडकीस आले वन्यजीव तस्करीचे मोठे रॅकेट

Illegal Python Breeding Zhejiang : एका फ्लॅटमध्ये सुरू असलेला अजगरांच्या बेकायदेशीर पैदासीचा धक्कादायक कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 309 जिवंत अजगर जप्त केले असून संबंधित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना कोणत्याही गुप्तहेराची नाही, तर एका घराच्या अवाढव्य वीज बिलाची मदत झाली. आरोपीने आपल्या राहत्या घराच्या हॉल आणि सर्व बेडरूम्सचे रूपांतर सापांच्या फॅक्टरीत केले होते, जिथे प्लास्टिकच्या शेकडो कंटेनर्समध्ये हे अजगर कोंडून ठेवण्यात आले होते. या सर्व सापांची रवानगी आता स्थानिक प्राणीसंग्रहालयात करण्यात आली आहे. चीनच्या झेजियांग प्रांतात ही अजब घटना घडली.

एका सापाने दाखवला रस्ता आणि वीज बिलाने दिला पुरावा
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात मार्च 2014 मध्ये झाली, जेव्हा एका डोंगराच्या पायथ्याशी स्थानिक नागरिकाला एक मोठा अजगर आढळला. हिवाळ्याच्या दिवसांत साप सुप्त अवस्थेत असल्याने आणि त्या भागात अजगर निसर्गतः आढळत नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान एका सर्पतज्ज्ञाने पोलिसांना माहिती दिली की, अजगरांच्या पैदासीसाठी 24 तास कृत्रिम उष्णता आणि हीटर्सची गरज असते, ज्यामुळे वीज वापर प्रचंड वाढतो. या धाग्यावरून पोलिसांनी परिसरातील वीज वापराचे ऑडिट केले असता, ‘गुओ’ नावाच्या व्यक्तीच्या फ्लॅटचे वीज बिल कमालीचे वाढल्याचे समोर आले आणि पोलिसांचा संशय बळावला.

हेही वाचा – Android Earthquake Alert: व्हेनेझुएलात जमीन हादरण्यापूर्वी गुगलने दिला होता सावधगिरीचा मेसेज; स्क्रीनशॉटस व्हायरल

उंदरांचे पार्सल आणि सोशल मीडियावरील विक्री
संशयित गुओ याच्यावर पाळत ठेवली असता, ‘डी’ नावाची एक व्यक्ती त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना आढळले. हा 'डी' नावाचा साथीदार सापांना खाऊ घालण्यासाठी नियमितपणे पांढऱ्या उंदरांचे मोठे पार्सल मागवत असे. तसेच सोशल मीडियावर सापांचे फोटो शेअर करून त्यांची गुप्तपणे विक्री केली जात होती. पोलिसांनी या दोघांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवून दोन सापांची बेकायदेशीर विक्री झाल्याचा ठोस पुरावा गोळा केला आणि थेट गुओच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथे स्वतः गुओ सापांनी वेढलेल्या एका छोट्या खोलीत राहत असल्याचे पाहून पोलीसही चक्रावून गेले.

10 वर्षांचा अजब छंद आणि टोळीचा पर्दाफाश
पोलिस चौकशीत गुओने कबुली दिली की, त्याला सापांचे प्रचंड वेड होते आणि 2014 मध्ये केवळ 4 अजगर खरेदी करून त्याने स्वतःच त्यांची पैदास करण्याचे तंत्र शिकले होते. स्वतःला सापांचा ‘क्रिएटर’ समजणाऱ्या गुओने आपल्या साथीदारासह आतापर्यंत 80 अजगरांची विक्री केली होती. पोलिसांनी तपास पुढे नेत या टोळीला मूळ सापांचा पुरवठा करणाऱ्या ‘डेंग’ नावाच्या तिसऱ्या आरोपीलाही अटक केली आहे. डेंगच्या घरावर छापा टाकला असता, तिथेही आणखी 47 अजगर पोलिसांना मिळून आले. या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या कारवाईमुळे चीनमधील वन्यजीव तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

हेही वाचा – Dead Man Returns : धक्कादायक ट्विस्ट! अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीने वाजवली घराची बेल; कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हाही नोंदवला होता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number