Bank Recruitment: बँकेत नोकरीची मोठी संधी! आयबीपीएस पीओअंतर्गत 6715 जागांसाठी मेगा भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारत सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणे बंधनकारक आहे.

Bank Recruitment: बँकेत नोकरीची मोठी संधी! आयबीपीएस पीओअंतर्गत 6715 जागांसाठी मेगा भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

Bank Recruitment : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयबीपीएसने प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी 16 वी सामायिक भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या अंतर्गत देशातील एकूण 11 सरकारी बँकांमध्ये मिळून 6715 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या मेगा भरतीची अधिकृत अधिसूचना 30 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

अर्जाचे वेळापत्रक आणि संकेतस्थळ
या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जुलै 2026 पासून सुरू झाली असून उमेदवारांना 21 जुलै 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून आपले अर्ज सादर करता येतील. अंतिम क्षणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी इच्छुकांनी मुदतीपूर्वीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांना आयबीपीएसच्या अधिकृत http://www.ibps.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. अंतिम मंजुरीनंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नसल्याने प्रत्येक तपशील काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.

पात्रता निकष आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारत सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणे बंधनकारक आहे. ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे संगणक प्रणालीचे व्यावहारिक ज्ञान असणेही आवश्यक मानले गेले आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणे आवश्यक आहे. याचा अर्थ उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1996 पूर्वी आणि 1 जुलै 2006 नंतर झालेला नसावा. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 5 वर्षे तर इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांची सूट समाविष्ट आहे.

अर्ज शुल्क आणि रिक्त जागांचे वर्गीकरण
परीक्षा फी भरण्यासाठी उमेदवारांना नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि यूपीआयचा वापर करता येईल. सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 850 रुपये तर अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. एकूण 6715 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 2719 जागा, ओबीसीसाठी 1816 जागा, एससीसाठी 1009 जागा, एसटीसाठी 502 जागा आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 669 जागा अंदाजित आहेत.

हेही वाचा – UPSC Recruitment 2026: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची मोठी संधी; UPSC कडून थेट भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी

बँकनिहाय रिक्त पदांचा तपशील
सध्यातरी एकूण आठ बँकांनी आपली आकडेवारी दिली आहे, तर इंडियन बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या तीन बँकांकडून अद्याप जागांची माहिती येणे बाकी असल्याने अंतिम संख्येत वाढ होऊ शकते. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार बँकनिहाय जागा पुढीलप्रमाणे आहेत:
·बँक ऑफ बडोदा: 1900 जागा
·कॅनरा बँक: 1500 जागा
·बँक ऑफ महाराष्ट्र: 1100 जागा
·इंडियन ओव्हरसीज बँक: 550 जागा
·पंजाब नॅशनल बँक: 504 जागा
·बँक ऑफ इंडिया: 500 जागा
·सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 500 जागा
·पंजाब अँड सिंध बँक: 161 जागा

निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे वेळापत्रक
उमेडवारांची अंतिम निवड ही तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर आधारित असेल, ज्यामध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि सामायिक मुलाखत घेतली जाईल. ऑगस्ट 2026 मध्ये प्राथमिक परीक्षा आणि नोव्हेंबर 2026 मध्ये मुख्य परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 मध्ये मुलाखतीची फेरी पार पडेल आणि जानेवारी 2027 मध्ये पात्र उमेदवारांना तात्पुरते वाटप केले जाईल. अंतिम निवडीसाठी मुख्य परीक्षेला 80 टक्के आणि मुलाखतीला 20 टक्के गुणांचे वेटेज दिले जाणार आहे.

हेही वाचा – Maharashtra Board: दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत मोठी क्रांती! आता पेपर तपासणार AI, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात होणार मोठे बदल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number