IAF aircraft crash Assam : आसाममधील जोरहाट मिलिटरी एअरबेसवरून एका विमानाला अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय वायू दलाचे (IAF) एएन-32 (AN-32) हे मालवाहू वाहतूक विमान शनिवारी दुर्घटनाग्रस्त झाले. प्राथमिक माहितीनुसार, हे विमान एअरबेसवर सुरक्षितपणे उतरले होते, परंतु लँडिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अचानक त्याला आग लागली. लष्करी तळाच्या आतच ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि लष्कराच्या आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
वायू दलाकडून अधिकृत निवेदन जारी
या गंभीर अपघातानंतर भारतीय वायू दलाने तात्काळ एक संक्षिअधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून घटनेला दुजोरा दिला आहे.प्त निवेदनात नमूद माहितीनुासर आसाममधील जोरहाट येथे आज वायू दलाचे एएन-32 विमान अपघातग्रस्त झाले आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती आणि नवीन अपडेट्स हाती येताच ते अधिकृतपणे प्रसिद्ध केले जातील. सध्या एअरबेसच्या आत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
हेही वाचा – FSSAI Notice: नेस्ले, KFC अन् फ्लिपकार्टला दणका; मॅगी अन् खजुरात आढळल्या अळ्या; FSSAI कडून कडक नोटिसा जारी
नुकसान आणि जीवितहानीबद्दल अद्याप अस्पष्टता
या भीषण आगीत विमानाचे नेमके किती नुकसान झाले आहे किंवा विमानातील वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची स्थिती कशी आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक स्तरावर जीवितहानी किंवा इतर कोणत्याही बाबींविषयी अधिकृत माहिती नाही. विमानाला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
विमानाला आग लागल्याचे समजताच एअरबेसवरील अग्निशामक दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली. वरिष्ठ लष्करी अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत. विमान लँडिंगच्या वेळी काही तांत्रिक बिघाड झाला होता की धावपट्टीवरील इतर काही कारणामुळे ही आग भडकली, हे तपासानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. संपूर्ण परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आवश्यक ती माहिती गोळा करण्यासाठी तज्ज्ञांचे एक पथक घटनास्थळी दाखल होणार आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच वायू दलाकडून या अपघाताचे सविस्तर कारण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Fire News: 10 मजली शासकीय इमारतीला भीषण आग; विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या 4 हजार EVM जळून खाक