Sheikh Hasina: ‘जीव गेला तरी चालेल, पण देशात परतणार…’; माजी पंतप्रधान शेख हसीना यांची मोठी घोषणा

एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा निर्णय जाहीर केला असून, बांगलादेशात पाऊल ठेवताच अटक होण्याचा किंवा थेट मृत्यूचा धोका असला, तरीही आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Sheikh Hasina: ‘जीव गेला तरी चालेल, पण देशात परतणार…’; माजी पंतप्रधान शेख हसीना यांची मोठी घोषणा

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी डिसेंबरच्या सुमारास इतर निर्वासित नेत्यांसह स्वेच्छेने मायदेशात परतण्याची मोठी घोषणा केली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा निर्णय जाहीर केला असून, बांगलादेशात पाऊल ठेवताच अटक होण्याचा किंवा थेट मृत्यूचा धोका असला, तरीही आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे आणि जनक्षोभामुळे सत्ता सोडावी लागल्यानंतर त्यांनी भारतात राजाश्रय घेतला होता.

न्यायालयात शरण जाण्याची तयारी
शेख हसीना यांनी स्पष्ट केले आहे की, बांगलादेशात परतल्यानंतर त्या तिथल्या न्यायालयासमोर स्वतःला शरण करणार आहेत. आपल्या या परतीच्या प्रवासाबाबत ढाक्यातील सध्याच्या अंतरिम किंवा तात्पुरत्या सत्ताधाऱ्यांशी कोणतीही पूर्वचर्चा किंवा तडजोड झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. "मायदेशात परतल्यावर ते मला गजाआड करू शकतात किंवा माझा जीवही घेऊ शकतात, परंतु काहीही झाले तरी मला तिथे जावेच लागेल," अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

समर्थकांची अवस्था आणि भावनिक आवाहन
सध्या बांगलादेशात असलेल्या आपल्या राजकीय सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दयनीय स्थितीबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पक्षाचे कार्यकर्ते सध्या भीषण दडपशाहीचा सामना करत असल्याचे सांगत शेख हसीना म्हणाल्या, "माझ्या अवामी लीगचे नेते संकटात असताना मी दूर राहू शकत नाही. जर मला मृत्यू यायचाच असेल, तर तो माझ्या स्वतःच्या मातीत यावा; जिथे माझ्या आई-वडिलांचे दफन झाले आहे आणि जिथे त्यांचे रक्त सांडले आहे."

हेही वाचा – Donald Trump: ट्रम्प यांना मारण्याचा कट? इराणवर गंभीर आरोप; इस्रायलच्या गुप्तचराच्या दाव्याने खळबळ

फाशीची शिक्षा आणि कायदेशीर कारवाईची पार्श्वभूमी
शेख हसीना यांचे हे वक्तव्य बांगलादेशच्या 'आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणा'ने (International Crimes Tribunal) त्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर समोर आले आहे. वर्ष 2024 मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान निदर्शकांवर झालेल्या हिंसक कारवाईत मानवाधिकार उल्लंघन आणि अनेक नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार धरत न्यायाधिकरणाने त्यांना दोषी ठरवले आहे. याच खटल्यात माजी गृहमंत्री असदुझ्झमान खान कमाल यांनाही फाशीची शिक्षा झाली असून, माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने शेख हसीना आणि कमाल या दोघांचीही मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number