Islamabad Summit Hotel Bill: अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थीचा आव आणणाऱ्या पाकिस्तानवर हॉटेल बिल न भरल्याने नामुष्की; नेमकं काय घडलं?

पाहुण्यांच्या हॉटेलचे बिल भरण्यासाठीही पाकिस्तान सरकारकडे पैसे नसल्याचे समोर आले असून, जगभरात त्यांची मोठी नाचक्की झाली आहे.<br/>

Islamabad Summit Hotel Bill: अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थीचा आव आणणाऱ्या पाकिस्तानवर हॉटेल बिल न भरल्याने नामुष्की; नेमकं काय घडलं?

Islamabad Summit Hotel Bill: आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी एक मोठा डाव खेळला होता, जो आता त्यांच्या अंगलट आला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये एका भव्य शिखर परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, या परिषदेनंतर पाहुण्यांच्या हॉटेलचे बिल भरण्यासाठीही पाकिस्तान सरकारकडे पैसे नसल्याचे समोर आले असून, जगभरात त्यांची मोठी नाचक्की झाली आहे.

पंचतारांकित हॉटेलमध्ये 'फुकट'ची मेजवानी? 'सेरेना' हॉटेलचे प्रकरण आले समोर
इस्लामाबादमधील प्रसिद्ध 'Serena Hotel' मध्ये 10 ते 12 एप्रिल  2026 दरम्यान ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांचीही उपस्थिती होती. अमेरिका आणि इराणला एकाच टेबलावर आणल्याचा दावा करत पाकिस्तानने सुरुवातीला स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र, बैठकीनंतर जेव्हा बिल भरण्याची वेळ आली, तेव्हा पाकिस्तान सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे उघड झाले.

हॉटेल मालकावरच बिल भरण्याची वेळ; लज्जास्पद प्रकार उघड
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार बिल भरण्यास असमर्थ ठरल्याने अखेर हॉटेलच्या मालकांनाच (आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कशी संबंधित) स्वतःच्या खिशातून हे बिल भरावे लागले. एका सार्वभौम देशाचे सरकार आपल्या देशात अधिकृत निमंत्रणावरून आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाचे आणि राहण्याचे बिल भरू शकत नाही, ही घटना आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत लज्जास्पद मानली जात आहे. यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक दिवाळखोरीचे वास्तव जगासमोर आले आहे.

हेही वाचा – News Channel Ban: आशा भोसले यांच्या श्रद्धांजलीच्या बातम्यांवरून 'या' देशात गदारोळ; अजब कारण देत चॅनेल बंद करण्याचा इशारा

मध्यस्थीची संधी गमावली अन् प्रतिमा डागाळली; पाकिस्तानचे दुहेरी अपयश
पाकिस्तानने या बैठकीद्वारे स्वतःला एक 'विश्वासू मध्यस्थ' म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. जगाला आपली मुत्सद्दी क्षमता दाखवण्याची ही एक मोठी संधी पाकिस्तानकडे होती. मात्र, या प्रक्रियेत त्यांना दुहेरी अपयशाचा सामना करावा लागला. राजकीय स्तरावर अमेरिका आणि इराणमध्ये कोणताही ठोस समझोता घडवून आणण्यात पाकिस्तानला यश आले नाही, तर आर्थिक स्तरावर हॉटेल बिलाच्या प्रकरणामुळे त्यांची जगात मोठी फजिती झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number