Election Of Pope : पोप फ्रान्सिस यांच्यानंतर पुढील पोप कोण असतील? कशी होते निवड?

पोप फ्रान्सिस यांच्या देहावसानानंतर येत्या काही दिवसांतच नवीन पोपची नियुक्ती करण्यासाठी बैठक घेतली जाईल. यानंतर मतदान होईल. व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिश्चन धर्मगुरूची निवड कशी केली जाते, जाणून घेऊ..

Election Of Pope : पोप फ्रान्सिस यांच्यानंतर पुढील पोप कोण असतील? कशी होते निवड?

व्हॅटिकन सिटी : ख्रिश्चन जगताचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रोन्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. बऱ्याच काळाच्या आजारपणानंतर त्यांनी आज (सोमवार) सकाळी 7:35 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचे संपूर्ण जीवन प्रभू आणि त्यांच्या चर्चच्या सेवेसाठी समर्पित होते, असे या घटनेची घोषणा करताना व्हॅटिकन कॅमरलेंगो कार्डिनल केविन फॅरेल यांनी सांगितले. पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथॉलिक चर्चचे 266 वे पोप होते. ते 2013 साली या पदी नियुक्त झाले होते.

पोप फ्रान्सिस यांच्या देहावसानानंतर येत्या काही दिवसांतच नवीन पोपची नियुक्ती करण्यासाठी पुढील प्रक्रिया राबवली जाईल. जाणून घेऊ, ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू निवडण्याची पद्धत कशी असते..

Election Of Pope: व्हॅटिकन सिटीचे पोप हे कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू आणि व्हॅटिकन सिटीचे राज्यप्रमुख असतात. हे पद कॅथोलिक चर्चमधील सर्वोच्च पदांपैकी एक आहे. चर्चची धोरणे आणि शिकवणी ठरवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना धार्मिक गुरु असेही म्हणतात.

नवीन पोप निवडण्यासाठी, जुन्या पोपला प्रथम त्यांचा औपचारिक राजीनामा जाहीर करावा लागतो किंवा त्यांच्या देहावसानानंतर ही प्रक्रिया राबवली जाते. कारण, या प्रक्रियेमध्ये ती राबवण्याचे कारण आणि तारीख स्पष्टपणे नमूद करावी लागते. पोपचा मृत्यू झाला नसेल आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर ही प्रक्रिया घडवायची असेल तर, कॅनन कायद्यानुसार, राजीनामा मुक्तपणे आणि स्वेच्छेने दिलेला असला पाहिजे. राजीनाम्यानंतर पोपचे पद रिक्त मानले जाते.

यानंतर कार्डिनल्सची बैठक बोलावली जाते. येथे नवीन पोपची निवड केली जाते. कार्डिनल हे कॅथोलिक चर्चचे उच्चपदस्थ धर्मगुरू आहेत, जे चर्चच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावतात. कार्डिनल्सच्या बैठका व्हॅटिकन सिटीच्या सिस्टिन चॅपलमध्ये होतात. येथे नवीन पोपविषयीची चर्चा केली जाते.

कार्डिनल्सच्या बैठकीनंतर, सर्वजण सिस्टिन चॅपलमध्ये जमतात. या काळात ते बाहेरील जगापासून अलिप्त राहतात आणि पोप निवडण्यास मदत करतात. या काळात कार्डिनल्स 2-2 च्या गटात मतदान करतात. प्रत्येक कार्डिनल त्याच्या पसंतीचे नाव एका पत्रावर लिहितो आणि ज्या पोपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, तो पुढचा पोप बनतो.

जेव्हा नवीन पोपची निवड केली जाते, तेव्हा कार्डिनल्सचा एक प्रतिनिधी सिस्टिन चॅपलच्या बाल्कनीत उभा राहतो आणि नवीन पोपची घोषणा करतो. तो "हॅबेमुस पापम" म्हणतो. म्हणजेच, आपल्याला एक नवीन पोप मिळाला आहे आणि तोच त्या नवीन पोपचे नाव जाहीर करतो. यानंतर नवीन पोप बाल्कनीत येतात आणि जनतेला आशीर्वाद देतात.

व्हॅटिकनमध्ये नवीन पोपची घोषणा झाल्यानंतर, त्यांचा औपचारिक समारंभात अभिषेक केला जातो. या समारंभात व्हॅटिकनचे उच्च अधिकारी आणि जगभरातील अनेक धर्मगुरू सहभागी होतात. आजही पोपची निवडणूक पूर्णपणे मॅन्युअल मतदानाद्वारे होते.

पुढील पोप कोण असू शकतील?
इटलीचे कार्डिनल पिएट्रो पारोलिन : 70 वर्षीय इटालियन कार्डिनल पिएट्रो पारोलिन हे पोप फ्रान्सिसचे परराष्ट्र मंत्री आहेत आणि सध्या त्यांचे उत्तराधिकारी होण्यासाठी ते सर्वात प्रबळ दावेदार आहेत. 10 वर्षांपूर्वी अमेरिका-क्युबा संबंधांमधील दरी आणि 2018 च्या व्हॅटिकन-चीन करारात मध्यस्थी करण्यासाठी ते ओळखले जातात.
फिलीपिन्सचे कार्डिनल लुईस अँटोनियो टॅगले यांच्या नावाची देखील पोप फ्रान्सिसचे उत्तराधिकारी म्हणून चर्चा आहे. यांच्याव्यतिरिक्त कार्डिनल पीटर एर्डो, कार्डिनल पीटर टर्कसन, कार्डिनल मारियो ग्रेच, कार्डिनल मॅट्टेओ झुप्पी हेही काही दावेदार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number