कोणत्या देशाकडे सर्वात जास्त अणुबॉम्ब आहेत? पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे आहे जड

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांकडे सर्वाधिक अणुबॉम्ब कोणाकडे आहेत? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. चला तर मग दोन्ही देशापैकी कोणाकडे अणुबॉम्ब जास्त आहेत? ते जाणून घेऊयात.

कोणत्या देशाकडे सर्वात जास्त अणुबॉम्ब आहेत? पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे आहे जड
Edited Image

नवी दिल्ली: पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगामला येणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य केले. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बदला घेतला आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले. भारताच्या या प्रत्युत्तराने पाकिस्तान अस्वस्थ झाला असून आता पाकिस्तानने भारतावर हल्ला सुरू केला आहे. परंतु, भारतीय सैन्य त्यांचे सर्व हल्ले हाणून पाडत आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. 

दरम्यान, आता लोकांना दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध होऊ शकते का? असा प्रश्न पडला आहे. तथापि, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांकडे सर्वाधिक अणुबॉम्ब कोणाकडे आहेत? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. चला तर मग दोन्ही देशापैकी कोणाकडे अणुबॉम्ब जास्त आहेत? ते जाणून घेऊयात. 

हेही वाचा – वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात घेतले सात फेरे; अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

रशियाकडे सर्वाधिक अणुबॉम्ब –  

FAS (फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स) वेबसाइटनुसार, रशियाकडे सर्वाधिक अणुबॉम्ब आहेत. रशियाकडे 5449 अणुबॉम्ब आहेत आणि त्यापैकी 1150बॉम्ब निवृत्त झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचा क्रमांक लागतो. अमेरिकेकडे 5277 अणुबॉम्ब आहेत आणि त्यापैकी 1577 निवृत्त झाले आहेत. चीन 600 अणुबॉम्बसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच 225 अणुबॉम्बसह फ्रान्स चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर युके असून एकूण 225 अणुबॉम्ब आहेत.

हेही वाचा – इंडियन ऑईल व एसबीआयबाबत अफवांचा पाऊस, अधिकृत खुलासा महत्त्वाचा

भारत आणि पाकिस्तानकडे किती अणुबॉम्ब – 

सर्वाधिक अणुबॉम्ब असलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे, ज्यांच्याकडे 180 अणुबॉम्ब आहेत आणि भारतानंतर येणाऱ्या देशाकडे 170 अणुबॉम्ब आहेत. हा देश दुसरा तिसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तान आहे. दोन्ही देशांमध्ये 10 अणुबॉम्बचा फरक आहे. याशिवाय, दोन्ही देशानंतर इस्रायलचा क्रमांक लागतो ज्याच्याकडे 90 अणुबॉम्ब आहेत, त्यानंतर उत्तर कोरियाचा क्रमांक लागतो ज्याच्याकडे 50 अणुबॉम्ब आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number