सर्वात मोठी तेल कंपनी Aramco वर मिसाइल आणि ड्रोन हल्ला! अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम फेल; जागतिक तेल पुरवठ्यावर संकटाचे ढग

या भागात तैनात असलेली अमेरिकेची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम हे हल्ले रोखण्यात सपशेल अपयशी ठरले, ज्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी तेल कंपनी Aramco वर मिसाइल आणि ड्रोन हल्ला! अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम फेल; जागतिक तेल पुरवठ्यावर संकटाचे ढग

Houthi Drone Attack Aramco: अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या वातावरणादरम्यान जगातली सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या 'अरामको'शी (Aramco) संबंधित सुविधा केंद्रांवर भीषण मिसाइल आणि ड्रोन हल्ले झाले आहेत. सौदी अरेबियातील जिजान (Jizan) औद्योगिक शहरात या हल्ल्यामुळे मोठे स्फोट झाले असून, अनेक भागांतील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. विशेष म्हणजे या भागात तैनात असलेली अमेरिकेची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम हे हल्ले रोखण्यात सपशेल अपयशी ठरले, ज्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत खळबळ उडाली आहे.

येमेनमधील हौथी बंडखोरांकडून प्रतिहल्ला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला येमेनमधील हौथी (Houthi) बंडखोरांकडून करण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या जिजान, यानबू आणि दमाद परिसराला लक्ष्य करून हे क्षेपणास्त्रे डागण्यात आली. शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाने हौथींच्या नियंत्रणाखालील होदेइदा शहरावर आणि तेथील दूरसंचार प्राधिकरणावर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना हौथींच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदीला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता आणि काही तासांतच अरामकोच्या सुविधा केंद्रांवर हा प्रतिहल्ला चढवला.

हेही वाचा – Sheikh Hasina Return: बांगलादेशात पुन्हा राजकीय भूकंप? शेख हसीनांच्या 'त्या' घोषणेनंतर राष्ट्रपती शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याची शक्यता

लाल समुद्रातील नाकेबंदी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारास धोका
हौथी बंडखोरांनी लाल समुद्रातील (Red Sea) सौदीच्या तेल टँकर्सवरही मिसाइल आणि ड्रोनद्वारे हल्ले केल्याचा दावा केला आहे. 20 जुलै रोजी जाहीर केलेल्या नाकेबंदीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे हूतींनी स्पष्ट केले. वर्ष 2022 पासून सौदी अरेबिया आणि हौथी बंडखोरांमध्ये सुरू असलेला शांतता करार आता पूर्णपणे मोडल्याचे चित्र आहे. लाल समुद्रातील व्यापारी मार्गांवर सातत्याने होणाऱ्या या हल्ल्यांमुळे जागतिक जहाजोद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर भडकण्याची शक्यता
जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपनीवर थेट हल्ला झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता प्रचंड वाढली आहे. अरामकोच्या या सुविधा केंद्राचे नेमके किती आर्थिक व भौतिक नुकसान झाले आहे, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या लष्करी तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा (Crude Oil) पुरवठा बाधित होण्याचा आणि आगामी दिवसांत इंधनाचे दर मोठ्या प्रमाणावर भडकण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा – Pakistan HIV Outbreak: पाकिस्तानात एचआयव्हीचा भीषण उद्रेक; शेकडो बालके-नागरिक बाधित, संसर्गाचे कारण..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number