Amitabh Bachchan Health Update: ‘रुग्णालय, ICU अन् शस्त्रक्रिया…’; अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगने वाढवली चाहत्यांची धाकधूक

'बिग बीं'नी आपल्या या पोस्टमध्ये अचानक रुग्णालय, तेथील वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेबाबत भाष्य केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.<br/>

Amitabh Bachchan Health Update: ‘रुग्णालय, ICU अन् शस्त्रक्रिया…’; अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगने वाढवली चाहत्यांची धाकधूक

Amitabh Bachchan Health Update:  अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय राहून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. परंतु, त्यांच्या ताज्या ब्लॉग पोस्टमधील काही उल्लेखांमुळे जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या मनात चिंतेची लाट पसरली आहे. ‘बिग बीं’नी आपल्या या पोस्टमध्ये अचानक रुग्णालय, तेथील वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेबाबत भाष्य केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – Ramayana Part 1 Trailer Leak: ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीजपूर्वीच इंटरनेटवर लीक; निर्मात्यांकडून धडक कारवाई

शस्त्रक्रिया आणि आयसीयू मधील तो कठीण अनुभव
ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातील दिवसांची आठवण जागवली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पार पडलेली शस्त्रक्रिया, आयसीयू (ICU) मधील काही काळ आणि त्यानंतर मिळालेला डिस्चार्ज या संपूर्ण प्रवासाचा उल्लेख त्यांनी केला आहे. हा अनुभव केवळ शारीरिक त्रास देणारा नसून मानसिकदृष्ट्याही अत्यंत आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“काहीजण लढतात, तर काही हार मानतात…”
रुग्णालयातून घरी परतल्यानंतरच्या टप्प्याबद्दल बोलताना त्यांनी लिहिले की, हा काळ एखाद्या व्यक्तीची खरी परीक्षा पाहणारा असतो. यश आणि वैभवाच्या शिखरावर असताना अचानक आजारपणाचा सामना करावा लागणे सोपे नसते. या कठीण प्रसंगात काही लोक मोठ्या धैर्याने लढा देऊन पुन्हा उभे राहतात, तर काहीजण परिस्थितीसमोर शरण जातात. जो संघर्षाचा मार्ग निवडतो तोच खरा विजेता ठरतो, असा सकारात्मक संदेशही त्यांनी दिला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number