Sirmaur Bus Accident: हिमाचल प्रदेशात खासगी बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून प्रवाशांचा अंत

ही बस सोलनहून हरिपुरधारच्या दिशेने जात होती. डोंगरदऱ्यांच्या वळणदार रस्त्यावरून जात असताना हरिपुरधारजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट खोल दरीत कोसळली.

Sirmaur Bus Accident: हिमाचल प्रदेशात खासगी बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून प्रवाशांचा अंत

Sirmaur Road Accident : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात शुक्रवारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 8 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस सोलनहून हरिपुरधारच्या दिशेने जात होती. डोंगरदऱ्यांच्या वळणदार रस्त्यावरून जात असताना हरिपुरधारजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट खोल दरीत जाऊन कोसळली. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर परिसरात किंकाळ्या ऐकू येत होत्या. दरीतून मदतीसाठी येणारे आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले.

हेही वाचा – Pregnancy Job Scam : गर्भवती राहा अन् 10 लाख कमवा ! बिहारमध्ये सायबर भामट्यांचा विचित्र घोटाळा उघड

बचावकार्य आणि मृतांची स्थिती
या बसमध्ये अंदाजे 40 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बसच्या तुटलेल्या भागांमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते, त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीने कष्टाने बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवाशांना तात्काळ जवळच्या रुग्णालयांत उपचारासाठी हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रशासनाकडून चौकशीचे आदेश
जिल्हा प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंगराळ भागातील खराब रस्ते, बसचा वेग की तांत्रिक बिघाड, यामुळे हा अपघात झाला, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हरिपुरधार परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – Viral Story : उंदीर मारण्याचं औषध मागवलं…पण डिलीव्हरी बॉयच्या ‘या’ कृत्यामुळे वाचला महिलेचा जीव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number