Wedding Ceremony Mishap : लग्न म्हटले की, सगळ्या निमंत्रितांमध्ये आनंदाचे वातावरण असते. अशाच एका लग्नसोहळ्यात सर्वजण पारंपरिक नाच-गाण्यात दंग झालेले असताना एका अनपेक्षित दुर्घटना घडली. यामध्ये मोठ्या संख्येने लोक जखमी झाले. सुदैवाने कोणाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, असा अपघात घडल्यामुळे सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली आहे.
अचानक कोसळले छप्पर
या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत छप्पर अचानक कोसळताना (Roof Suddenly Collapsed) आणि लोक मोठ्या संख्येने खाली पडताना दिसत आहेत. छप्पर कोसळताच सुमारे 100 लोक खाली पडले, त्यापैकी 25 जण जखमी झाले. सुदैवाने, या अपघातात कोणीही गंभीर जखमी (Seriously Injured) झाले नाही, अन्यथा मोठा अनर्थ (Chamba Marriage Tragedy) घडला असता. छतावर लोकांचे वजन जास्त झाल्याने ते एकाएकी कोसळले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
अति वजन आणि कमकुवत छपरामुळे घडला प्रकार
हिमाचल प्रदेशातील चंबा (Chamba, Himachal Pradesh) जिल्ह्यातून एक मोठी दुर्घटना (Major Accident in Marriage Ceremony) समोर आली आहे. येथील शहवा गावात आयोजित एका लग्न समारंभात घराचे छप्पर कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ उडाला. या अपघातात 25 जण जखमी (Injured) झाले आहेत. छतावर त्यावेळी जवळपास 100 लोक उपस्थित होते आणि त्यांचे नाच-गाणं सुरू होते.
जखमींमध्ये 20 महिलांचा समावेश
छप्पर कोसळल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य (Wedding Ceremony Mishap Rescue Work) सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या 25 लोकांमध्ये सुमारे 20 महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 जण अधिक जखमी झाले आहेत, तर बाकीच्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
पोलिसांकडून चौकशीचे आदेश
चुराह विधानसभा मतदारसंघातील (Churah Assembly Constituency) शहवा गावात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने गावात पोहोचले आणि त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले. चंबाचे उपायुक्त मुकेश रेप्सवाल यांनी घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे पथक तातडीने पोहोचल्याचे सांगितले. स्थानिक आमदार हंसराज यांनीही जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Accident caught in 4K.
Just 2-3 ays ago during a marriage function in Chamba, the roof of a house suddenly collapsed where people were sitting. Around 20 people were injured but thankfully no major casualty. Now the drone footage of this incident has emerged . pic.twitter.com/U6CIOa4Os0 — Nikhil saini (@iNikhilsaini) December 8, 2025
छप्पर जुने होते का?
छप्पर कशामुळे कोसळले, याचा शोध पोलीस (Police) घेत आहेत. छप्पर जास्त जुने (Old) आणि कमजोर (Weak) होते का, त्यामुळे ते अधिक वजन सहन करू शकले नाही का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या तीन (3) महिलांवर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार (Treatment) सुरू असून, डॉक्टरांचे पथक (Doctor’s Team) त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा – UIDAI New Rules: हॉटेलमध्ये थांबण्यासाठी आधारची पेपर कॉपी OUT, डिजिटल व्हेरिफिकेशन IN; UIDAIचे नवे धोरण