उत्तरकाशी: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सकाळी 9 वाजता गंगानाईजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरच्या अवशेषांचे फोटोही समोर आले आहेत. हे हेलिकॉप्टर एका खाजगी कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर गंगोत्रीकडे जात होते. घटनेची माहिती मिळताचं स्थानिक लोक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
प्राप्त माहितीनुसार, गंगोत्री धामकडे जाणारे एरो ट्रान्स खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले. हा अपघात गंगानाईच्या पुढे, नाग मंदिराच्या खाली, भागीरथी नदीजवळ घडल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर गंगोत्री धामच्या यात्रेला गेलेल्या भाविकांना घेऊन जात होते.
हेही वाचा – Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल जगभरातून काय प्रतिक्रिया उमटल्या?
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि मदत संस्था सक्रिय झाल्या. घटनास्थळी पोलिस, विशेष लष्कराचे पथक, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी टीम, एनडीआरएफ, एसडीआरएफ, 108 रुग्णवाहिका सेवा, तहसीलदार भटवाडी, बीडीओ भटवाडी आणि महसूल विभागाच्या पथके रवाना करण्यात आली. अद्याप अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. तथापि, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
Sad news coming in from Uttarakhand . According to posts by govt officials – A helicopter crashe kills five passengers , two grievously injured, near Ganganani in Uttarkashi district. According to reports Garhwal Divisional Commissioner Vinay Shankar Pandey has confirmed the… pic.twitter.com/RWaQXbX7rM — manisha singhal (@manishasinghal) May 8, 2025
हेही वाचा – आमच्या मुलीने आमच्या देशासाठी खूप मोठे काम केले; सोफियाच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री धामी यांनी व्यक्त केला शोक –
दरम्यान, याप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांचे विधान समोर आले आहे. सीएम धामी यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘उत्तरकाशीतील गंगणीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात काही लोकांच्या मृत्यूची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यांना देव शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबांना हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या संदर्भात, मी अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.’