Helicopter Crash: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू, उच्चस्तरीय तपासाचे आदेश

हवेत असतानाच हे हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळल्याने त्यातील सर्व 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Helicopter Crash: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू, उच्चस्तरीय तपासाचे आदेश

Helicopter Crash: सौदी अरेबियातील आघाडीचे तेल आणि औद्योगिक केंद्र असलेल्या 'रास तानुरा' येथून एक अत्यंत थरारक व दुर्दैवी बातमी समोर आली आहे. रविवारी पहाटे सुमारे 6:00 वाजता जगातील सर्वात मोठी तेल कंपनी 'सौदी अरामको'च्या एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. हवेत असतानाच हे हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळल्याने त्यातील सर्व 14 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सौदीच्या ऊर्जा मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत तिथल्या सरकारी वृत्तसंस्थेने या अत्यंत गंभीर दुर्घटनेची अधिकृत घोषणा केली आहे.

मृतांमध्ये सर्व प्रवासी सौदीचे नागरिक; ऊर्जा मंत्रालयाकडून दुःख व्यक्त
सौदी प्रेस एजन्सीने (SPA) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या हवाई अपघातात प्राणाला मुकलेले सर्व 14 जण हे सौदी अरेबियाचेच रहिवासी होते. हा अपघात पर्शियन आखाताच्या किनारपट्टीवर वसलेल्या रास तानुरा या महत्त्वाच्या परिसरात झाला, जो सौदी अरामको कंपनीच्या तेल उत्खनन आणि औद्योगिक घडामोडींचे मुख्य केंद्र मानला जातो. या आकस्मिक दुर्घटनेनंतर सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाने तीव्र शोक व्यक्त केला असून, मृतांच्या शोकाकुल कुटुंबियांबद्दल मनापासून सहानुभूती प्रकट केली आहे.

हेही वाचा – Skydivers Plane Crash: मोठी बातमी! स्कायडायव्हिंगसाठी निघालेल्या विमानाचा भीषण अपघात; सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश; तेल उत्पादनावरील परिणामाबाबत गुप्तता
भीषण अपघाताची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन पथकांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हे हेलिकॉप्टर नेमके कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा हवामानातील बदलामुळे कोसळले, याचा शोध घेण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर नेमके कोणत्या मॉडेलचे होते आणि या दुर्घटनेमुळे अरामकोच्या तेल पुरवठ्यावर किंवा दैनंदिन कामकाजावर काही परिणाम झाला आहे का, याबाबी अद्याप प्रशासनाने गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number