Hardeep Singh Puri Video: इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटते? केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी सगळं स्पष्टच सांगितलं..

जगभरात निर्माण झालेला कच्च्या तेलाचा प्रश्न आणि इंधनाचे वाढणारे दर या पार्श्वभूमीवर भारतात इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या पॉलिसीला विरोध होत आहे.

Hardeep Singh Puri Video: इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटते? केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी सगळं स्पष्टच सांगितलं..

Hardeep Singh Puri Clarification on Ethanol : भारतामध्ये गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून वापरले जात आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या धोरणाचे सातत्याने समर्थन केले असले, तरी या इंधनाबाबत सध्या अनेक शंका आणि आक्षेप घेतले जात आहेत. अमेरिका व इराण यांच्यातील संघर्षामुळे जगभरात निर्माण झालेला कच्च्या तेलाचा प्रश्न आणि इंधनाचे वाढणारे दर या पार्श्वभूमीवर भारतात इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या पॉलिसीला विरोध होत असून ती मागे घेण्याची मागणी काही घटकांकडून केली जात आहे.

मायलेजच्या समस्येवर मंत्र्यांचे उत्तर
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सकाळी एका पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांचे मायलेज काही प्रमाणात कमी होते, अशी कबुली त्यांनी दिली; मात्र यासाठी केवळ इथेनॉल नाही तर इतरही अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात, असे त्यांनी नमूद केले. उत्तम अ‍ॅक्सलरेशनसाठी रेसिंग कार्समध्येही इथेनॉलचा वापर केला जातो, हे आता सिद्ध झाले असल्याचे सांगत त्यांनी मायलेजबाबतच्या भीतीला उत्तर दिले.

हेही वाचा – Petrol Diesel Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; भारतीय ग्राहकांना कधी मिळणार गूड न्यूज?

विम्यासंदर्भातील अफवांचे खंडन
इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरणाऱ्या वाहनांना विमा कंपन्या सेवा नाकारतात, असा एक मोठा दावा बाजारात केला जात होता. या अफवेचा समाचार घेत हरदीप सिंग पुरी यांनी विमा कंपन्यांनी असा कोणताही नियम नसल्याचे आधीच स्पष्ट केल्याचे सांगितले. SIAM आणि ARAI यांसारख्या सर्व महत्त्वाच्या संस्था व घटकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच सरकारने इंधनात इथेनॉल मिश्रणाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील धोरण आणि तंत्रज्ञान
असे गैरसमज पसरवून नक्की कोणाचा फायदा होत आहे, असा सवाल उपस्थित करत पुरी म्हणाले की, भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने आणि फ्लेक्स इंधन (दोन प्रकारच्या इंधनांवर चालणारी वाहने) अशा दोन्ही प्रकारच्या तंत्रज्ञानाला एकाच वेळी मोठा वाव आहे. सध्या आपण पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळत असून, भविष्यात हे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत नेण्याचा निर्णय सर्व आवश्यक आणि महत्त्वाच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number