Hantavirus Outbreak: समुद्रात ‘हँटाव्हायरस’चा हाहाकार! डच क्रूझ जहाजावर 3 प्रवाशांचा मृत्यू; WHO कडून हाय-अलर्ट

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या जहाजाशी संबंधित 8 प्रकरणांची माहिती दिली असून, यामध्ये आतापर्यंत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Hantavirus Outbreak: समुद्रात ‘हँटाव्हायरस’चा हाहाकार! डच क्रूझ जहाजावर 3 प्रवाशांचा मृत्यू; WHO कडून हाय-अलर्ट

Hantavirus Outbreak: अर्जेंटिनाहून काबो वर्देकडे प्रवास करणाऱ्या ‘एमव्ही होंडियस’ (MV Hondius) या डच क्रूझ जहाजावर हँटाव्हायरसच्या संसर्गामुळे खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या जहाजाशी संबंधित 8 प्रकरणांची माहिती दिली असून, यामध्ये आतापर्यंत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती दिली आहे.

अँडीज व्हायरसचा संसर्ग आणि मानवी साखळी
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, आढळलेल्या 8 प्रकरणांपैकी 5 रुग्णांना हँटाव्हायरस झाल्याचे निश्चित झाले आहे, तर 3 संशयित रुग्ण आहेत. यामध्ये विशेषतः ‘अँडीज व्हायरस’चा (Andes Virus) समावेश आहे. ही हँटाव्हायरसची एक अशी प्रजाती आहे जी लॅटिन अमेरिकेत आढळते आणि मानवाकडून मानवाकडे पसरण्याची क्षमता ठेवते. संसर्ग झालेल्या पहिल्या रुग्णामध्ये 6 एप्रिल रोजी लक्षणे दिसली होती, ज्याचा 11 एप्रिल रोजी जहाजावरच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचाही जोहान्सबर्गला जात असताना 26 एप्रिल रोजी मृत्यू झाला.

संसर्गाचे मूळ आणि प्रवाशांची पार्श्वभूमी
तपासादरम्यान असे समोर आले आहे की, हे प्रवासी क्रूझवर चढण्यापूर्वी अर्जेंटिना, चिली आणि उरुग्वेमध्ये पक्षीनिरीक्षणाच्या सहलीवर होते. या भागात अँडीज विषाणू वाहून नेणाऱ्या उंदरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. सध्या दोन संक्रमित प्रवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, अन्य एक रुग्ण जर्मनीमध्ये असून एका प्रवाशाला स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – Strait of Hormuz: जागतिक ऊर्जा संकटात मोठा दिलासा; अमेरिका आणि इराणमध्ये करार, ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा खुली होणार

12 देशांना सतर्कतेचा इशारा
या घटनेनंतर जागतिक आरोग्य संघटनेने सेंट हेलेना येथे उतरलेल्या प्रवाशांच्या संदर्भात 12 देशांना सतर्क केले आहे. यामध्ये कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि सेंट किट्स अँड नेव्हिस या देशांचा समावेश आहे. सध्या जहाजावरील उर्वरित कर्मचारी किंवा प्रवाशांमध्ये लक्षणे दिसत नसली तरी, या संसर्गाच्या उगमाची सखोल चौकशी सुरू आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number