PM Kisan 22nd Installment : खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात 22 व्या हप्त्याचे पैसे येणार; यादीत नाव ‘असं’ चेक करा

सरकारने नियमात केलेल्या बदलांमुळे अनेक लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात. त्यामुळे हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.<br/>

PM Kisan 22nd Installment : खुशखबर! शेतकऱ्यांच्या खात्यात 22 व्या हप्त्याचे पैसे येणार; यादीत नाव ‘असं’ चेक करा

PM Kisan 22nd Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेच्या 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आली असून, पुढील महिन्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने नियमात केलेल्या बदलांमुळे अनेक लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात. त्यामुळे हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमच्या गावाची 'लाभार्थी यादी' कशी पाहाल? (Step-by-Step)
तुमच्या गावातील कोणाकोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा:

वेबसाईटला भेट द्या: सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा. 
पर्याय निवडा: होम पेजवर असलेल्या 'Beneficiary List' (लाभार्थी यादी) या टॅबवर क्लिक करा. 
माहिती भरा: तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा. 
रिपोर्ट पहा: 'Get Report' वर क्लिक करताच तुमच्या गावाची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल. यात तुमचे नाव तपासा.

तुमचे 'स्टेटस' (Status) कसे तपासायचे?
जर यादीत नाव नसेल, तर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी हे करा:

वेबसाईटवरील 'Know Your Status' पर्यायावर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि कॅप्चा कोड टाकून ओटीपी (OTP) सबमिट करा.
तुमच्या माहितीसमोर जर 'Green Tick' (हिरवी खूण) दिसत नसेल, तर तुमच्या माहितीत त्रुटी असू शकते.

हेही वाचा – India-US Trade Deal: भारतात अमेरिकन वाइन येणार, पण दूध-धान्याला मात्र 'नो एन्ट्री'; मोदी सरकारने जपलं शेतकऱ्यांचं हित

ई-केवायसी (e-KYC) पूर्ण आहे का?
ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांचा 22 वा हप्ता थांबू शकतो. केवायसी करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:

ऑनलाईन पद्धत: पोर्टलवर 'e-KYC' पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि मोबाईल ओटीपीद्वारे प्रक्रिया पूर्ण करा.
ऑफलाईन पद्धत: जर ऑनलाईन जमत नसेल, तर जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे केवायसी करून घ्या. हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि 'Land Seeding' (जमीन नोंदणी) पूर्ण असणे अनिवार्य आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number