Gold-Silver Price Today: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात 10,000 रुपयांची विक्रमी घसरण; पाहा आजचे ताजे दर

सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.57 लाख रुपयांच्या खाली आला असून, या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.<br/>

Gold-Silver Price Today: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात 10,000 रुपयांची विक्रमी घसरण; पाहा आजचे ताजे दर

Gold-Silver Price Today:  भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरातील घसरण 16 मे 2026 रोजीही कायम राहिली आहे. शनिवारी 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमच्या किमतीत तब्बल 10,000 रुपयांची घट नोंदवण्यात आली, तर चांदीच्या किमतीतही 10,000 रुपयांची मोठी पडझड होऊन 1 किलो चांदीचा दर 2.80 लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.57 लाख रुपयांच्या खाली आला असून, या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

MCX आणि जागतिक बाजारातील स्थिती
शुक्रवार, 15 मे 2026 च्या सत्रात MCX वरील सोने आणि चांदीच्या किमतींनी मोठी घसरण अनुभवली. शुक्रवारी सोन्याचा दर 10 ग्रॅममागे सुमारे 1,58,450 रुपयांवर बंद झाला, तर चांदीचा दर 8 टक्क्यांच्या घसरणीसह 1 किलोमागे 2,74,388 रुपयांवर स्थिरावला. जागतिक स्तरावर 'स्पॉट गोल्ड' प्रति औंस 4,547 डॉलरवर आले असून, यात साप्ताहिक 4 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच 'स्पॉट सिल्व्हर' प्रति औंस 75.75 डॉलरवर बंद झाली आहे.

किमती घसरण्यामागील प्रमुख कारणे
या दरवाढीला आळा बसण्यामागे जागतिक आर्थिक आकडेवारी महत्त्वाची ठरली आहे. अमेरिकेतील महागाईने 2023 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली असून, अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'ची नाकेबंदी यामुळे जागतिक बाजारपेठ दबावाखाली आहे. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता धूसर झाल्याने आणि UBS धोरणतज्ज्ञांनी सोन्याच्या मागणीचा अंदाज कमी केल्याने किमतींवर परिणाम झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील कमी वापर आणि खाणींतून वाढलेला पुरवठा यामुळे चांदीच्या बाजारातील पुरवठ्याची तूटही 300 दशलक्ष औंवरून 60-70 दशलक्ष औंसपर्यंत खाली आली आहे.

भारतातील आजचे सोन्याचे दर  
विविध श्रेणींमधील सोन्याच्या दरात झालेली घट खालीलप्रमाणे आहे:

24 कॅरेट सोने (शुद्ध सोने):

100 ग्रॅम: 15,69,300 रुपये (9,800 रुपयांची घसरण)
10 ग्रॅम: 1,56,930 रुपये (980 रुपयांची घसरण)
8 ग्रॅम: 1,25,544 रुपये

22 कॅरेट सोने (दागिन्यांचे सोने):

100 ग्रॅम: 14,38,500 रुपये (9,000 रुपयांची घसरण)
10 ग्रॅम: 1,43,850 रुपये (900 रुपयांची घसरण)
1 ग्रॅम: 14,385 रुपये

18 कॅरेट सोने:

100 ग्रॅम: 11,77,000 रुपये (7,300 रुपयांची घसरण)
10 ग्रॅम: 1,17,700 रुपये (730 रुपयांची घसरण)

हेही वाचा – Rupee vs USD: रुपयाची विक्रमी घसरण! इतिहासात पहिल्यांदाच गाठली नीचांकी पातळी; सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

चांदीच्या दरातही मोठी पडझड
भारतात 1 किलो (999 शुद्धता) चांदीचा दर 10,000 रुपयांनी कोसळून 2.80 लाख रुपयांवर आला आहे. किरकोळ बाजारात 100 ग्रॅम चांदीचा दर 28,000 रुपये असून, 10 ग्रॅम चांदीसाठी आता 2,800 रुपये मोजावे लागत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जागतिक अनिश्चितता आणि मागणीतील घट यामुळे आगामी काळात दरात आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number