DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्याची थकबाकी ‘या’ महिन्यात होणार जमा

जुलैपासून लागू होणारी वाढ आणि त्यासोबतची तीन ते चार महिन्यांची थकबाकी (Arrears) सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत.<br/>

DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्याची थकबाकी ‘या’ महिन्यात होणार जमा

DA Hike New Update: केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठीच्या महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2026 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकार साधारणपणे वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करते. या प्रक्रियेनुसार, जुलैपासून लागू होणारी वाढ आणि त्यासोबतची तीन ते चार महिन्यांची थकबाकी (Arrears) सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत.

3 टक्क्यांच्या वाढीसह 63 टक्क्यांचा टप्पा गाठणार
यंदा महागाई भत्त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जर ही वाढ मंजूर झाली, तर एकूण महागाई भत्ता 63 टक्क्यांवर पोहोचेल. याशिवाय, 8 व्या वेतन आयोगाबाबतही हालचाली सुरू असून, महागाई भत्त्याचे मूळ वेतनामध्ये विलीनीकरण करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. 8 वा वेतन आयोग आपल्या शिफारसी 2027 च्या पहिल्या सहामाहीत सरकारकडे सादर करेल, अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

राज्य सरकारांकडून वाढीचा धडाका
केंद्राच्या निर्णयाआधीच अनेक राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे. उत्तराखंड, बिहार, हरियाणा, राजस्थान, गोवा, ओडिशा, तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वाढीव भत्ता आणि थकबाकी थेट बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – Silver Import Restricted: चांदी आयातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; लावण्यात आले निर्बंध, कारण समोर

सप्टेंबरपर्यंत खात्यात पैसे जमा होण्याची प्रतीक्षा
जानेवारी 2026 ची पहिली थकबाकी एप्रिलमध्ये मिळाल्यानंतर, आता कर्मचारी दुसऱ्या सहामाहीच्या थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत. नियमानुसार, जुलैपासून लागू होणारी ही वाढ आणि मागील महिन्यांची थकबाकी सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात जास्तीचे पैसे येणार असून, निवृत्तीवेतनधारकांनाही याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number