ATF Price Drop: विमान प्रवास करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! तिकीट दर होणार कमी; ‘या’ मोठ्या शुल्कात कपातीची शक्यता

विमान कंपन्यांनी या वर्षी मार्च महिन्यात लागू केलेला इंधन अधिभार (Fuel Surcharge) पूर्णपणे काढून टाकण्याबाबत गंभीर विचार सुरू केला आहे.

ATF Price Drop: विमान प्रवास करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! तिकीट दर होणार कमी; ‘या’ मोठ्या शुल्कात कपातीची शक्यता

ATF Price Drop: मध्यपूर्वेतील इराण आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक तणाव कमी झाल्यानंतर आता विमान वाहतूक क्षेत्रातील खर्चाचा भार हलका होण्याचे संकेत मिळत आहेत. एका अहवालानुसार, विमान कंपन्यांनी या वर्षी मार्च महिन्यात लागू केलेला इंधन अधिभार (Fuel Surcharge) पूर्णपणे काढून टाकण्याबाबत गंभीर विचार सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि विमान इंधनाच्या (ATF) किमतीत झालेल्या घसरणीमुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, यामुळे सर्वसामान्य विमान प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि खिशाला परवडणारा होणार आहे.

तिमाहीच्या शेवटी किंवा पुढील तिमाहीच्या सुरुवातीला निर्णयाची शक्यता
मार्च महिन्यात मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते, ज्यामुळे विमान कंपन्यांना इंधन अधिभार लावणे भाग पडले होते. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने देशांतर्गत विमान कंपन्यांमध्ये हा सरचार्ज हटवण्याबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. कंपन्या सध्या इंधनाच्या किमतीतील ही घसरण दीर्घकाळासाठी स्थिर राहते का, यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. सर्व काही आटोक्यात राहिल्यास चालू आर्थिक वर्षाच्या 2 र्या तिमाहीच्या शेवटी किंवा 3 र्या तिमाहीच्या सुरुवातीला यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते.

घरगुती विमान प्रवास आधी स्वस्त होणार; 'या' कंपन्या घेणार पुढाकार
प्राप्त माहितीनुसार, विमान कंपन्या सुरुवातीला देशांतर्गत (Domestic) विमान फेऱ्यांवरील इंधन अधिभार पूर्णपणे हटवतील आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय (International) मार्गांवरून तो टप्प्याटप्प्याने कमी केला जाईल. यापूर्वी परिस्थिती बिघडल्यानंतर इंडिगो (IndiGo), एअर इंडिया (Air India) आणि आकासा (Akasa) यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी तिकिटांवर अतिरिक्त सरचार्ज लावला होता.

हेही वाचा – Bharosa Scheme: बेरोजगार तरुणांना दरमहा 3000 रुपये भत्ता, तर निवृत्त पत्रकारांना 5000 रुपयांची पेन्शन… सरकारने घेतला मोठा निर्णय

प्रवाशांच्या संख्येत होणार वाढ:

इंधन अधिभार लागू केल्यामुळे विमानाची तिकिटे महागली होती, ज्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या संख्येवर झाला होता. प्रवाशा अभावी कंपन्यांना काही विमाने रद्द करावी लागली होती, तर काहींचे मार्ग बदलावे लागले होते. आता हा अतिरिक्त भार हटल्यास तिकिटांचे दर थेट कमी होतील आणि हवाई वाहतूक पुन्हा एकदा गतीने पूर्वपदावर येईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number