Gold-Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात तेजी; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण पाहायला मिळत असतानाच, भारतीय स्थानिक सराफा बाजारात मात्र अचानक मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

Gold-Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात तेजी; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

Gold Silver Price Today Update: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण पाहायला मिळत असतानाच, भारतीय स्थानिक सराफा बाजारात मात्र उलट चित्र निर्माण झाले आहे. आज अमेरिकन कमोडिटी एक्सचेंज (COMEX) वर सोन्याच्या दरात 0.19% घसरण होऊन ते 4,152.6 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. असे असले तरी भारतीय बाजारात सोने कालच्या तुलनेत 0.91% ने महागले असून स्थानिक पातळीवर सोन्याच्या दरात अचानक मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

सोन्याचे 24, 22 आणि 18 कॅरेटचे ताजे भाव
स्थानीय बाजारात विविध शुद्धतेच्या सोन्याच्या दरांमध्ये झालेली ही वाढ खालीलप्रमाणे आहे:
– 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम मागे थेट 1290 रुपयांनी वाढला असून आजचा भाव 1,43,820 रुपये झाला आहे, जो काल 1,42,530 रुपये इतका होता.
– 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम मागे 1190 रुपयांनी वधारून 1,31,843 रुपयांवर पोहोचला आहे, काल हा भाव 1,30,653 रुपये होता.
– 18 कॅरेट सोन्याच्या दरात 972 रुपयांची वाढ झाली असून आजचा दर 1,07,865 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, जो काल 1,06,893 रुपये नोंदवला गेला होता.

मध्य पूर्वेतील तणावाचा बाजारावर थेट परिणाम
अमेरिकन सैन्य आणि इराण समर्थित गटांमधील वाढता संघर्ष सोन्याचे दर अचानक वधारण्यामागील मुख्य कारण ठरला आहे. इराकमधील 'पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस' (PMF) या विद्रोही गटाने अमेरिकन लष्करी तळ आणि सौदी अरेबियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोन हल्ले केले होते. याला चोख प्रत्युत्तर देत अमेरिकन सैन्याने इराकमध्ये मोठा बाँबहल्ला केला असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी अधिक कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – Crude Oil Price : ज्याची भीती होती तेच झालं! ट्रम्प यांच्या धमकीनंतर कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलच्या दरांनी वाढवली धाकधूक

सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढता कल
जागतिक स्तरावर युद्ध अथवा राजकीय अशांततेची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सोन्याकडे सुरक्षित मालमत्ता म्हणून पाहिले जाते. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखीम असलेल्या ठिकाणांमधून आपले पैसे काढून सोन्यामध्ये सुरक्षितपणे गुंतवणे पसंत करतात. या सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय घसरणीनंतरही स्थानिक पातळीवर सोन्याचे दर उंचावले आहेत.

चांदीच्या दरातही मोठी भरारी
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही लक्षणीय तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर COMEX वर चांदीचे भाव 0.12% ने वाढून 59.09 डॉलर प्रति ट्रॉय औंस झाले आहेत, तर स्थानिक बाजारात चांदीचा भाव 1.08% ने वधारून 2.20 लाख रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला आहे. युद्धाच्या सावटाव्यतिरिक्त सौर ऊर्जा पॅनेल आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातून वाढणाऱ्या औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किमतींना अतिरिक्त पाठबळ मिळत आहे.

हेही वाचा – Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणी सरकारवर नाराज? तब्बल दोन हजार महिलांचा योजनेचा लाभ घेण्यास नकार; कारण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number