Gold-Silver Rates Today : सध्या लग्नसराईच्या (Wedding Season) दिवसांत सोन्याच्या आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूच्या दरांनी युटर्न घेतल्यामुळे खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज (शुक्रवार, 5 डिसेंबर) सोन्याचा भाव किंचित कमी झाला असला तरी, चांदीच्या भावात तब्बल 4 हजार रुपयांनी मोठी घसरण (Sharp Drop in Silver Rates) नोंदवली गेली आहे, ज्यामुळे खरेदीदारांना मोठा फायदा होऊ शकतो.
MCX वर दर घसरले, पण घसरण मर्यादित
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) महत्त्वाच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) बैठकीतील निर्णयांपूर्वी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बाजाराच्या सुरुवातीला दर घसरले. मात्र, कमकुवत अमेरिकन डॉलर (Weak US Dollar) आणि वाढत्या मागणीमुळे (Rising Demand for Gold) सोन्याच्या किमतीतील घसरण मर्यादित राहिली. अमेरिकन डॉलर एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला. MCX वर सोन्याचा फेब्रुवारीचा वायदा 0.14 टक्क्यांनी घसरून 1 लाख 29 हजार 892 प्रति 10 ग्रॅमवर होता, पण चांदीचे फ्युचर्स 0.74 टक्क्यांनी वाढून 1 लाख 79 हजार 461 प्रति किलोवर पोहोचले.
सराफा बाजारातील आजचे दर
देशांतर्गत सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1 लाख 29 हजार 660 रुपयांवर आली आहे. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 29 हजार 650 रुपये आहे, तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 1 लाख 18 हजार 840 रुपयांना मिळत आहे. याशिवाय 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 97 हजार 230 रुपये दर आहे. मात्र, एक किलो चांदीची किंमत भारतीय बाजारांमध्ये 1 लाख 90 हजार 900 रुपयांवर उसळली आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष RBI च्या धोरणावर
सध्या देशांतर्गत गुंतवणूकदारांचे (Investors) लक्ष RBI च्या MPC धोरण निर्णयावर (MPC Policy Decision) केंद्रित आहे. संमिश्र आर्थिक संकेतांमुळे RBI च्या धोरणाबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद (Difference of Opinion) पाहायला मिळत आहेत. GDP चे मुख्य आकडे मजबूत असले तरी, नाममात्र जीडीपी आणि उत्पादन क्षेत्रातील कमकुवतपणा 25-बेसिस-पॉइंट दर कपातीच्या दृष्टिकोनाला समर्थन देऊ शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक पातळीवर अमेरिकेच्या आकडेवारीची प्रतीक्षा
जागतिक पातळीवर गुंतवणूकदार (Global Investors) आज उशिरा येणाऱ्या अमेरिकेच्या चलनवाढीच्या (US Inflation) आकडेवारीची वाट पाहत आहेत. हे आकडे पुढील आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) धोरणात्मक निर्णयाबद्दलच्या अपेक्षांना आकार देतील. अलीकडील मिश्रित अमेरिकन मॅक्रो डेटामुळे फेडच्या पुढील धोरणात्मक निर्णयावर अनिश्चितता निर्माण झाली होती.