Check Bounce Case: ’25 वेळा संधी दिली, आता…’; राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारलं

दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या राजपालच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राजपालच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्याला कडक शब्दांत फटकारले आहे.<br/>

Check Bounce Case: ’25 वेळा संधी दिली, आता…’; राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारलं

Check Bounce Case : प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स आणि 9 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेल्या राजपालच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राजपालच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्याला कडक शब्दांत फटकारले आहे.

शिक्षा स्थगितीवर प्रश्नचिन्ह
सुनावणी दरम्यान, न्यायालयाने राजपाल यादवला विचारले की, त्याने पैसे घेतल्याचे कबूल केले असताना आता शिक्षा रद्द करण्याची मागणी का केली जात आहे? न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, राजपालने आधी अपराध कबूल केला होता आणि पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वारंवार संधी देऊनही त्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. 'तुम्हाला 25 वेळा संधी दिली, तरीही तुम्ही टाळाटाळ केली," असे म्हणत न्यायालयाने सुनावणीदरम्यान कठोर टिप्पणी केली.

वकिलांचा युक्तिवाद
राजपाल यादवच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, राजपालने न्यायालयाचा मान राखण्यासाठी स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे. चित्रपटात गुंतवणूक करण्यासाठी घेतलेले 5 कोटी रुपये परत करण्याचा त्यांचा हेतू होता आणि त्यापैकी 3 कोटींहून अधिक रक्कम आधीच परत करण्यात आली आहे. उर्वरित रकमेपैकी 2.10 कोटी रुपये सुरक्षा म्हणून जमा करण्याची तयारीही वकिलांनी दर्शवली. तसेच, राजपालच्या कुटुंबात लग्न असल्याने त्याला जामीन मिळावा, अशी विनंती करण्यात आली.

'चित्रपटसृष्टीच्या पाठिंब्याचा याच्याशी काय संबंध?'
राजपालच्या वकिलांनी असाही उल्लेख केला की, त्याला चित्रपट उद्योग आणि जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. यावर न्यायालयाने संताप व्यक्त करत विचारले, "याचा या प्रकरणाशी काय संबंध?" हे प्रकरण पूर्णपणे व्यावसायिक कर्ज आणि आर्थिक व्यवहाराचे आहे, असे न्यायालयाने ठणकावून सांगितले. जर राजपाल रक्कम जमा करण्यास तयार असेल, तरच पुढील सुनावणी सुरू राहील, असे संकेत न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा – Udit Narayan: उदित नारायण यांच्या अडचणीत वाढ; पहिल्या पत्नीचा गंभीर आरोप; म्हणाल्या, "संमतीशिवाय काढलं गर्भाशय"

बॉलिवूड मदतीला धावून आले 
राजपाल यादव आर्थिक संकटात आणि तुरुंगात असताना बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यामध्ये गायक मिका सिंग, अभिनेता अजय देवगण आणि सोनू सूद यांचा समावेश आहे. या सुपरस्टार्सनी राजपालला या कायदेशीर आणि आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number