iPhone 17 : आयफोनसाठी कायपण! Gen Z कर्मचाऱ्याचं राजीनाम्याचं पत्र व्हायरल

अनेकजण विविध कारणांसाठी नोकरी करतात. मात्र, पगार पगारात वाढ होत नसल्याने किंवा चांगली संधी मिळेल, या आशेने अनेकजण नोकरी सोडतात. नोकरी सोडण्याबाबत अनेक मीम्सदेखील सतत व्हायरल होतात.

iPhone 17 : आयफोनसाठी कायपण! Gen Z कर्मचाऱ्याचं राजीनाम्याचं पत्र व्हायरल

मुंबई: अनेकजण विविध कारणांसाठी नोकरी करतात. मात्र, पगार पगारात वाढ होत नसल्याने किंवा चांगली संधी मिळेल, या आशेने अनेकजण नोकरी सोडतात. नोकरी सोडण्याबाबत अनेक मीम्सदेखील सतत व्हायरल होतात. अशातच, एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर एका झेन-झी कर्मचाऱ्याने नोकरी सोडण्याचं हास्यास्पद कारण शेअर केलं आहे. हा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत. 

सोशल मीडियावर एका झेन-झी कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल होत आहे. त्याने लिहिले की, ‘राजीनामा पत्र. आदरणीय सर, बाजारात आयफोन 17 आला आहे. मात्र, सध्याच्या पगारात माझा ईएमआय भरणं अवघड आहे. त्यामुळे, मी जास्त पगार असलेल्या पॅकेजसाठी दुसरी नोकरी स्विच करत आहे. आपला विनम्र, झेन-झी’. इतकं प्रामाणिक कारण पत्रात लिहिल्याने सोशल मीडियावर या पोस्टबाबत चांंगलीच चर्चा रंगली आहे. 

या व्हायरल पोस्टवर, अनेक युझर्सने हास्यास्पद कमेंट्स केले. एका युझरने लिहिले की, ‘बरं झालं, मी आयफोनसाठी इतकी वेडी नाही झाले. अँड्रॉईड बेस्ट आहे’. तर दुसऱ्या युझरने कंमेट केली की, ‘हे तर आताच आमच्यासोबत झालं’. यासह, आणखी एका युझरने लिहिले की, ‘सॅमसंग हे आयफोनपोक्षा अप्रतिम आहे’. काही अनेकांनी हसणारा इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केले. हा राजीनामा खरा आहे की केवळ एक विनोद आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या पत्राने अनेक नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. 

19 सप्टेंबर रोजी, आयफोन – 17 लॉंच झाला होता. या आयफोनला घेण्यासाठी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ॲपल स्टोअरबाहेर मोठी गर्दी झाली होती. विशेष बाब म्हणजे, आयफोन – 17 घेण्यासाठी एक व्यक्ती चक्क अहमदाबादमधून याठिकाणी आला होता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number